देवळाली प्रवरा / प्रतिनिधी देवळाली प्रवरा येथे सालाबादप्रमाणे श्री. दत्त मंदिराच्या प्रांगणात श्री.गुरुचरित्र पारायण सोहळा गुरुवा...
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथे सालाबादप्रमाणे श्री. दत्त मंदिराच्या प्रांगणात श्री.गुरुचरित्र पारायण सोहळा गुरुवार दि १ डिसेंबर ते गुरवार ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.पारायणा नंतर विविध महारांचे प्रवचन आयोजित केले आहे.
गुरुवर्य ह.भ.प रघुनाथ महाराज उंबरेकर आणि ब्रह्मलीन ह.भ.प श्रीहरी महाराज भालेकर यांच्या कृपा आशिर्वादाने व ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे व भास्करराव तांबे यांच्या नेतृत्वाखाली श्री. दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री.गुरुचरीञ पारायण सोहळा गुरुवार १ डिसेंबर ते गुरवार ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केला आहे.दैनंदिन कार्यक्रमात सकाळ व दुपारची आरती, प्रवचन, खिचडी प्रसाद वाटप, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज ११ वाजता होणाऱ्या प्रवचन सेवेत गुरुवार १ डिसेंबर रोजी ह.भ.प सुभाष महाराज विधाटे, शुक्रवार २ डिसेंबर रोजी ह.भ.प रोहिदास महाराज सांगळे, शनिवार ३ डिसेंबर रोजी ह.भ.प बाबा महाराज मोरे,रविवार ४ डिसेंबर रोजी ह.भ.प नामदेव महाराज जाधव, सोमवार ५ डिसेंबर रोजी बाळकृष्ण महाराज खांदे, मंगळवार ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब महाराज वाळूंज , बुधवार ७ डिसेंबर रोजी ह.भ.प बाबानंद महाराज वीर आदींचे प्रवचने होणार आहे.
दैनंदिन होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी हरीष वाळुंज,बाळासाहेब मोरे,सुनिल होले,राजेंद्र बाबुराव कदम,इंदुबाई पुंड,संदिप कदम,संदिप ढुस,बाळासाहेब मुसमाडे,बोर्डे,श्री.ञ्यंबकराज स्वामी दिंडी व्यवस्थापन मंडळ,मच्छींद्र पठारे,प्रकाश शिंदे,प्रसाद कोळेकर,विलास लक्ष्मण वाळुंज,बाळासाहेब मुसमाडे, सुभाष कुलट,सतिष वाळुंज,तुळजापूर पायी दिंडी व्यवस्थापन मंडळ,कविता भालेकर,बोर्डे आदींनी पारायणास बसलेल्या भाविकांना प्रसाद, चहा-पान व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवार दि.७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार चंद्रशेखर कदम व सौ.प्रियतमा कदम यांच्या हस्ते महाआरती संपन्न होणार आहे. तसेच गुरवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.शहरातील नागरीकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर भालेकर, अनिल भालेकर, गणेश भालेकर आदींनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत