ब्राम्हणी(वेबटीम) गावाचव श्रद्धास्थान व जागृत देवस्थान बहीरोबा महाराजांच्या नवीन नियोजित मंदिराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी च...
ब्राम्हणी(वेबटीम)
गावाचव श्रद्धास्थान व जागृत देवस्थान बहीरोबा महाराजांच्या नवीन नियोजित मंदिराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी चंपाषष्ठी निमित्त अभिषेक व नारळ फोडून नवीन मंदिर उभारणीच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ब्राह्मणी सोसायटीचे चेअरमन सुरेश बानकर,सरपंच प्रकाश बानकर, महेंद्र तांबे, बाबासाहेब गायकवाड,अनिल ठूबे,भारत तारडे,शिवकांत राजदेव, संतोष हापसे, शिवाजी राजदेव, दादा हापसे,दिगंबर राजदेव, राम राजदेव, बाबासाहेब भवार,अशोक नगरे आदी उपस्थित होते.
बहीरोबा महाराजांच नवीन मंदिर व्हावे अशी गत अनेक वर्षापासून भावी भक्तांच स्वप्न होत. मंदिर व सभा मंडप बांधकामासाठी एकूण सुमारे १३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आहे.त्यासाठी प्रशस्त,सुबक असा मंदिराचा प्लॅन हाती घेण्यात आला आहे.खर्च मोठा आहे. अनेक भावी भक्त मंदिराच्या कामासाठी देणगी जमा करत आहेत.सर्वांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत