राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान केल्याप्र...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डी पॉल इंग्लिश मिडियम स्कुलचा उपप्राचार्य फादर जेम्स विरोधात धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने फादर जेम्स यास रात्री ताब्यात घेतले आहे.
याबाबत डिपॉल इंग्लिश मीडियम स्कुलमधील १४ वर्षीय विद्यार्थ्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मी माझे दोन मित्र शाळेच्या झाडाखाली क्रीडा स्पर्धेकरिता उभे असताना तेथे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी येवुन फिर्यादी विद्यार्थी यास तुमच्या शीख धर्मात दिलेल्या रितीरीवाजाप्रमाणे डोक्यावर घातलेली पगडी काढून केस कापून शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रहा आमच्या धर्माचा स्वीकार कर असे म्हणून दमदाटी करून मारहाण करण्याकरीता अंगावर धावून दमदाटी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत