राहुरी(वेबटीम) प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीच्या वतीने होणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे. नगर मनमाड रोडवर चालू ...
राहुरी(वेबटीम)
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीच्या वतीने होणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे.
नगर मनमाड रोडवर चालू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे रोडवर मागील महिन्यात झालेल्या अपघातात जोगेश्वरी फाटा,सूतगिरणी जवळ सहा प्रवाशी मृत्युमुखी पडले होते
प्रशासनाने कुठलीही कार्यवाही या ठिकाणी न केल्यामुळे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने रोडवर प्रशासनाचा निषेध म्हणून प्रशासनाचा दशक्रिया विधी आंदोलन शनिवार दि 3 डिसेंबर रोजी केले होते
त्यावेळी कृती समितीने आठ दिवसात या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण दुतर्फा वाहतूक चालू करावी या मागणीचे पत्र प्रशासनास दिले होते अन्यथा वसंत कदम यांनी आत्मदहन व देवेंद्र लांबे यांनी तहसील कचेरीत खड्डे खोदण्याचा इशारा दिला होता
प्रशासनाने या कृती समीतिच्या या आंदोलनाचा धसका घेऊन व जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन आज दि 9 डिसेंबर 2022 रोजी कृती समीचे वसंत कदम व देवेंद्र लांबे यांना प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून उद्या दि 10 डिसेंबर पासून या ठिकाणी दिशादर्शक तसेच दुचाकी व हलक्या स्वरूपाची वाहने या रोडवरून चालली जातील या स्वरूपाची उपाययोजना करण्याचे लेखी स्वरूपात पत्र तहसील कार्यालय राहुरी येथे दिले आहे
तसेच नवीन नगर मनमाड रोडचे काम जानेवारी 2023 च्या शेवटापर्यंत सुरू होईल असे आश्वासन दिले आहे
यावेळी तहसीलदार शेख,कृती समितीचे वसंत कदम, देवेंद्र लांबे, नॅशनल हायवे ऑथोरीटी चे रिडच्या प्रकल्प संचालक मिलिंद वाबळे ,टीम लीडर महेश मिश्रा, रेसिडन्स इंजिनिअर अलोक सिंग, साईट इंजियर दिगविजय पाटणकर,सर्व्हेयर मुजीफ सय्यद,शिंदे डेव्हलपर्स हे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत