अहमदनगर (वेबटीम) ज्येष्ठ पत्रकार, समाचारचे मालक संपादक महेंद्र कुलकर्णी (वय ५५) यांचे ह्रदयविकाराने आज शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना...
अहमदनगर (वेबटीम)
ज्येष्ठ पत्रकार, समाचारचे मालक संपादक महेंद्र कुलकर्णी (वय ५५) यांचे ह्रदयविकाराने आज शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दैनिक लोकसत्ताचे वार्ताहर ते लोकसत्ताचे निवासी संपादक आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म असूनही प्रतिष्ठित सांय दैनिकाचे मालक संपादक असा त्यांचा प्रवास आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण यासह विविध प्रश्नांचा त्यांचा मोठा अभ्यास होता. यावर त्यांनी सातत्याने लेखन केले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क होता. आज दुपारी त्यांनी 'सत्ते पे सत्ता' हा गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूक विषयी अग्रलेख लिहिला. त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने अंक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी हा अग्रलेख सोशल मीडियात शेअर केला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या निधनाची बातमी आली.
त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत