देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथिल जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा अधिकारी पदी रविंद्र ढुस यांची कार्यकारी संचालक यांच्या आदेशान्वये न...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथिल जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा अधिकारी पदी रविंद्र ढुस यांची कार्यकारी संचालक यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली.तत्कालीन शाखा अधिकारी बी.डी.वाळके यांच्या बाबत तक्रारी आल्याने त्याची दखल घेवून तांभेरे येथे कँशियर म्हणून बदली करण्यात आली.ढुस यांचे विविध राजकीय, संघटना मिञ परीवार आदींनी निवडी बद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा सहकारी बँक म्हणजे सहकार व शेतकरी यांची बँक म्हणून ओळखली जाते.या बँकेचा ग्राहकवर्ग मोठा असल्याने बँकेत कामकाज मोठ्या प्रमाणात असुन तत्कालीन शाखा अधिकारी वाळके यांच्या संदर्भात बँक ग्राहकांनी कार्यकारी संचालक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्या होत्या.या तक्रारीची दखल घेवून वाळके यांची उचलबांगडी करुन तांभेरे शाखेत कँशियर म्हणून बदली करण्यात आली आहे. वाळके यांच्या जागी याच शाखेतील रविंद्र ढुस यांची शाखाधिकारी म्हणून कार्यकारी संचलक यांनी नियुक्ती केली आहे.
ढुस यांनी राहुरी, राहुरी कारखाना, टाकळीमियाँ, बेलापूर, देवळाली प्रवरा आदी शाखेत काम केले आहे.ढुस यांच्या नियुक्ती नंतर बँकेशी सलग्न असलेल्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी बँकेचे ग्राहक यांनी अभिनंदन करुन सत्कार केला आहे.ढुस यांचा पञकार राजेंद्र उंडे यांच्यासह माजी शाखा अधिकारी रमेश गोसावी, नानासाहेब पठारे,शिवाजीराव मुसमाडे,अरुण ढुस आदींनी सन्मान करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे अधिकारी शुभम खर्डे,काशिनाथ देवगिरे,वसंतराव राशिनकर,मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत