संजय कळमकर यांची राज्य प्राथ. शिक्षक समितीला सोडचिठ्ठी आज रविवारी समर्थाकांसहित करणार शिक्षक संघात प्रवेश नगर : वृत्तसेवा ...
संजय कळमकर यांची राज्य प्राथ. शिक्षक समितीला सोडचिठ्ठी
आज रविवारी समर्थाकांसहित करणार शिक्षक संघात प्रवेश
नगर : वृत्तसेवा
नगर : शिक्षक बँक निवडणुकीतील पराभवानंतर गुरुकुलमध्ये सुरू झालेली अंतर्गत धुसफूस अखेर बाहेर आलीच. संघटनेचे रा.या औटीमुळे संघटनेचे नुकसान होतेय, धामणेनी उमेदवारीचा हट्ट धरल्याने मंडळाला फटका बसला, तर काकडे, आंधळे काही पदाधिकाऱ्यांची मनमानी, तसेच काहींनी तर कळमकरासह अन्य उमेदवारांना मतेच टाकली नाही, इत्यादी अंतर्गत कटशाहीला कंटाळून डॉ संजय कळमकर यांनी समर्थकांसह राज्य प्राथमिक शिक्षक संघाला सोडचिठ्ठी देत शिक्षक संघात प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते, तर, या निर्णयावर रा.या औटी, धामणे गटातून कळमकरानी आतापर्यंत वैयक्तिक फायद्यासाठीच संघटनेचा वापर केला असून, शिक्षक बँकेत त्यांचे नेतृत्व नाकारल्यानंतर त्यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा देखील सहानुभूती मिळविण्यासाठीची एक नौटंकी होती, अशी जहरी टीका होऊ लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
याबाबत कळमकर समर्थक भास्कर नरसाळे म्हणाले, डॉ. कळमकर यांनी शिक्षक राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. परंतु आम्हाला जिल्ह्यातील दुसरे कुठलेही नेतृत्व मान्य नव्हते. शिक्षकांचे प्रश्न कौशल्याने सोडवण्याची धमक फक्त डॉ. कळमकर यांच्यातच आहे. त्यामुळे गुरुकुलच्या कार्यकर्त्यांनी हट्टाला पेटून त्यांना पुन्हा कार्यरत होण्याची विंनती केली. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्राथमिक शिक्षक संघच प्रभावीपणे काम करत आहे. शिक्षकांचे राज्यपातळीवरील कुठलेही प्रश्न फक्त शिक्षक संघच सोडवू शकतो याची आम्हाला खात्री झाली आहे. त्यामुळेच आम्ही सर्वजण संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेत आहोत, आज रविवार दि. ११ डिसेंबर रोजी स. ११.३० वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास गुरुकुलच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
।।।।।।।।।.।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।। कळमकर स्वार्थी....... ! राज्य नेते रा.या.औटी व जिल्हाध्यक्ष धामणे यांची टीका
समितीत काम करणारे काही असंतुष्ट लोक अनेक पदे भोगल्यानंतर व स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी समिती कार्यकर्त्यांचा वापर करून घेत होते. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व जिल्ह्याने नाकारले, त्यामुळे शिक्षकी राजकारणातून संन्यास घेण्याच्या बातम्या पेरून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची दिशाभूल करत काही कार्यकर्त्यांचा गट बाजूला करून दुसऱ्या संघटनेची वाट धरली आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व शिक्षक समिती प्रेमींनी काही दिवस संयम बाळगावा, लवकरच समितीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यात सर्व भूमिका स्पष्ट केली जाईल. तो पर्यंत कोणीही समितीच्या विरोधात भूमिका घेवू नये असे आवाहन राज्य नेते रा.या.औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी केले आहे.
शिक्षक नेते व साहित्यिक डॉ.संजय कळमकर हे रविवारी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या थोरात गटात प्रवेश करणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर औटी, धामणे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्ह्यातील शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व समिती प्रेमी शिक्षक यांना आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, नगर जिल्ह्यात शिक्षक समिती गेल्या १०-१५ वर्षांपासून काम करत आहे.प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यात समितीचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे समितीत अनेकांनी प्रवेश केलेला आहे. समितीचे काम पारदर्शी व लोकशाही पद्धतीने सुरु असल्याने समितीच्या राज्य नेतृत्वाने अनेकांना संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. परंतु समितीत काम करणारे काही असंतुष्ट लोक अनेक पदे भोगल्यानंतर व स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी समिती कार्यकर्त्यांचा वापर करून घेत होते. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व जिल्ह्याने नाकारले त्यामुळे शिक्षकी राजकारणातून संन्यास घेण्याच्या बातम्या पेरून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची दिशाभूल करत काही कार्यकर्त्यांचा गट बाजूला करून दुसऱ्या संघटनेची वाट धरली आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व शिक्षक समिती प्रेमींनी काही दिवस संयम बाळगावा, लवकरच समितीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यात सर्व भूमिका स्पष्ट केली जाईल. तो पर्यंत कोणीही समितीच्या विरोधात भूमिका घेवू नये असे आवाहन राज्य नेते रा.या.औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांच्यासह उच्चाधिकार समितीचे नितीन काकडे, अनिल आंधळे, राज्य प्रतिनिधी सिताराम सावंत, बापू लहामटे, मिलिंद पोटे,प्रताप पवार, रघुनाथ लबडे, ईश्वर माने, संभाजी औटी, दत्ता गरुड, प्रल्हाद साळुंके, विजय महामुनी, दत्ता जाधव, संतोष भोपे, राजन ढोले, अनिल अष्टेकर, दादा चोभे, बिभीषण हराळ, जयप्रकाश साठे, श्री. घाडगे, सुखदेव मोहिते, संदीप जंगले, अशोक घालमे, ऋषिकेश गोरे, गणेश कुलांगे, सुनिल लोंढे, जालिंदर खाकाळ, बबन बनकर, विजय जाधव, दादा अकोलकर आदींनी केले आहे.
नव्या पिढीकडे जबाबदारी देणार!
संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्यावर आम्ही शक्य तेवढे झोकून देत काम केलेले आहे, आता आम्हाला कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. ज्या शिक्षक कार्यकर्त्यांनी आजपर्यंत समिती व मंडळासाठी योगदान दिलेले आहे. त्यांच्या साठी पुन्हा संघटनेची बांधणी करून नवीन लोकांकडे कारभार सोपविण्यासाठी डिसेंबर अखेर जिल्हा मेळावा घेवून त्यात सध्याच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेवून नवीन कार्यकारणी जाहीर करत तरुण पिढीकडे समिती व मंडळाचा कारभार सोपविण्यात येणार असल्याचेही रा.या.औटी व संजय धामणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत