राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात उद्या रविवार दि ११ डिसेंबर रोजी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आश...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात उद्या रविवार दि ११ डिसेंबर रोजी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या अंतर्गत 'भव्य किल्ले बनवा महोत्सव' संपन्न होणार असून यानिमित्ताने गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे हे भविकांशी हितगुज साधणार आहे.
'संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे भारत राष्ट्र टिकेल' या उक्तीप्रमाणे
राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात जवळपास ८०० मुले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १५० किल्ले बनविणार आहे. दुपारी ४ वाजता बनविलेले किल्ले पहावयास मिळणार आहे. त्यांतर गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे हितगुज साधणार आहे. त्यांनंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राहुरी तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत