आंबी(वेबटीम) U राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित स्व. विठ्ठलराव पठारे पाटील इंग्...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित स्व.विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी अबेकस राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत घवघवीत यश मिळवले असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
परफेक्त इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अबेकस परीक्षेत सुमारे चार हजार विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये पठारे शाळेचे पहिलीचे विद्यार्थी राजवर्धन प्रदीप चव्हाण देशात दुसरा तर अस्मिता ज्ञानेश्वर पठारे उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. तर सांगली येथील प्रगती बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे घेतलेल्या अबेकस परीक्षेत इयत्ता दुसरीचा विद्यार्थी यश दिपक बागुल याने दुसरा क्रमांक मिळवला.
राजवर्धन चव्हाण हा देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांचा नातू आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्योती अंबिलवादे, मुख्याध्यापिका पल्लवी पठारे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक भागवत पठारे, संचालक ज्ञानेश्वर पठारे, उपशिक्षक श्रद्धा निद्रे, पूजा मुसमाडे, अंजली बेहळे, सारिका बागुल, अंजुम पठाण, राजेंद्र साळुंके, संदिप चव्हाण, दत्तात्रय पठारे, मीरा पठारे, शिक्षकेतर कर्मचारी त्रिंबक भालसिंग, सुनिल हिंगे, कल्पना हुडे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत