छावाची नगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त...... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छावाची नगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त......

नगर प्रतिनिधी  रविवार दि.11 रोजी अहमदनर शासकीय विश्राम गृह येथे अखिल भारतीय छावा नगर जिल्हा संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष जिल्ह...

नगर प्रतिनिधी 



रविवार दि.11 रोजी अहमदनर शासकीय विश्राम गृह येथे अखिल भारतीय छावा नगर जिल्हा संघटनेची बैठक संपन्न झाली.

बैठकीचे अध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे हे होते. बैठकीच्या अध्यक्ष पदाची सूचना दादा बडाख यांनी मांडली तर अनुमोदन अविनाश सातपुते यांनी दिले.

या बैठकीस मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रमुख नितीन पटारे म्हणाले की , अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी ,तालुका कार्यकारणी तीन वर्षांपूर्वी अ.भा.छावा संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आशिर्वादाने व केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने तयार करण्यात आली होती.संघटनेच्या नियमा नुसार दर तीन वर्षांनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन सदस्यांना काम करण्यासाठी संधी देण्यात येत असते.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे व विधार्थी प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांच्या आदेशाने अ.भा.छावा संघटना नगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात येत आहे.नवीन कार्यकारणी सोमवार दि.26 डिसेंबर 22 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

अ.भा.छावा संघटनेच्या ध्येय धोरणाला धरून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.यावेळी नविन सभासद नोंदणी करुण घेणे. संघटनेच्या योगदानानुसार कार्यकारणीत पद वाटपासाठी चर्चा करुन निर्णय होणे. विद्यार्थी आघाडी, कामगार अघाडी, वाहतुक अघाडी, शेतकरी अघाडी, युवक आघाडी, महिला अघाडी नव्याने निर्माण करणे. प्रत्येक तालुक्यात नविन शाखा उघडून गाव तिथे अ.भा.छावा संघटनेची शाखा हा उपक्रम राबवून तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवीने, नविन जिल्हा कार्यकारणी तयार करुण पुढील आंदोलनो कार्यक्रमाची दिशा ठरवीने या विषयवार चर्चा करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, नगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे.गेल्या तीन वर्षात जिल्हा प्रमुख नितीन पटारे यांच्या नेतृत्वा खाली जिल्ह्यात अ.भा.छावा संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून कष्टकरी , विद्यार्थी, अभियंता यांना न्याय देण्यात यशस्वी झाले आहे.जिल्ह्यामध्ये अ.भा.छावा संघटनेचे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अ.भा.छावा संघटनेकडे युवकांचा कल वाढलेला आहे.आपली संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्यामुळे कोणाचीही भीड न बाळगता सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवत आलेली आहे.संघटना बांधणी करून येणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे अधिवेशन नगर जिल्ह्यात घेण्यासाठी केंद्रीय कार्यकारणीकडे मागणी केली जाणार आहे.

या प्रसंगी नितीन पटारे ,देवेंद्र लांबे,अविनाश सातपुते,दादा बडाख,बहिरनाथ गोरे,प्रवीण देवकर,अमोल वाळुंज ,शरद बोंबले,गणेश धुमाळ,किरण उघडे,भाऊसाहेब वाडेकर,गणेश गायकवाड,सुभाष मोरे,शैलेश धुमाळ,उमेश नवघरे,सुहास निर्मळ,क्षीरसागर ज्ञानेश्वर,संतोष कोल्हे,संतोष कुटे,निलेश बनकर,अक्षय पटारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत