सोनगाव ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनगाव ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

  सात्रळ(वेबटीम) सोनगाव  ग्रामपंचायत मध्ये  बारा सदस्य व एक सरपंच पद असे असणाऱ्या  निवडणूकीची रणधुमाळी उडाली  असून प्रचार  शिगेला पोहचलेला अ...

 सात्रळ(वेबटीम)

सोनगाव  ग्रामपंचायत मध्ये  बारा सदस्य व एक सरपंच पद असे असणाऱ्या  निवडणूकीची रणधुमाळी उडाली  असून प्रचार  शिगेला पोहचलेला असून  शक्ती प्रदर्शन करत मतदारांना प्रत्यक्ष भेट, मिरवणूकी, आपसातील नाराजी  दूर  करण्यासाठी  गट चर्चा आदींनी  वातावरण  ढवळून निघाले आहे.



  ग्रामपंचायत मध्ये सत्ता  मिळविन्यासाठी राज्याचे महसूल व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री ना. राधाकृष्ण  विखे पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या  जनसेवा मंडळातील दोन पॅनल मध्ये लढत होत आहे.  सरपंच पद हे नागरिकांचा मागास  प्रवर्ग  मध्ये महिले साठी राखीव  आहे. जनसेवा मंडळाच्या एका  पॅनेलचे नेतृत्व  प्रवरा  ग्रामीण  शिक्षण  संस्था चे  संचालक  सुभाष जानजी अंत्रे, विखे कारखाना  संचालक  सुभाष नामदेव  अंत्रे, सोनगाव  सोसायटी  अध्यक्ष  राजेंद्र  अनाप, शामराव  अंत्रे यांच्याकडे असून त्यांच्या  पॅनल मधून सरपंचपदासाठी सौ. भारती  किरण अंत्रे  या उमेदवार  आहेत. या पॅनेलचे निवडणूक चिन्ह चहा ची किटली, छत्री, गॅस सिलेंडर, व बॅट  आहे. जनसेवेचे दुसऱ्या पॅनल चे नेतृत्व विखे कारखान्याचे  माजी संचालक  पाराजी धनवट, मुळा प्रवरा  इले. सोसायटी  चे संचालक  मच्छिन्द्र  अंत्रे तसेच सोनगाव  सोसायटी  चे उपाध्यक्ष  नारायण  धनवट  हे करीत असून त्यांच्या पॅनल  मधून सरपंचपदासाठी सौ. अलका सुभाष शिंदे या निवडणूक लढवीत आहेत तसेच त्यांचे निवडणूक चिन्ह  कपबशी, स्कुटर, ट्रॅक्टर व रिक्षा  आहेत. या निवडणूक प्रक्रियेत   राजन अशोक ब्राह्मणे  व पूजा  उत्तम  अनाप हे दोघे बिनविरोध  निवडून आले आहेत. 

मागील  ग्रामपंचायत  विखे गटाच्याच  ताब्यात होती व  सरपंच, उपसरपंच  व  सदस्यांनी  एकदिलाने कामकाज  करून गावात विकास कामांचा धडाका लावून गावातील  अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा सुधारणा, बाजारपेठेतील  रस्ता काँक्रीटीकरण,  पेव ब्लॉक  बसविणे, ग्रामपंचायत  उत्पन्न  वाढीसाठीचे प्रयत्न तसेच करोना काळातील  उत्तम नियोजन हे उल्लेखनिय  कामांचे श्रेय  घेतले  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत