श्रीरामपूर (वेबटीम) महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं होणाऱ्या वादांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड,...
श्रीरामपूर (वेबटीम)
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं होणाऱ्या वादांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, मंगलप्रसाद लोढा यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद नवीन असताना अजून एक वाद निर्माण झाला. भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक "सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरु कुणी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या, आता त्या काळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?" असे वादग्रस्त वक्तव्य केले.
या वक्तव्यावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ निर्माण झाला असून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला आहे. श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत मत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा निशेष नोंदवत निदर्शने केली. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे एस. के. चौदन्ते, आर. एम. धनवडे, राष्ट्रवादीचे लकी सेठी,भटके विमुक्त समाजाचे नेते मल्लू शिंदे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे मुश्ताकभाई तांबोळी, एकलव्य भिल्ल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे,भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संतोष मोकळ,विद्रोहीचे अमोल सोनवणे, संतोष त्रिभुवन, फिरोज शेख, नंदू कदम, भीम पँथरचे संजय वाव्हळ, राज खान, राजेश बोरुडे, हनीफभाई पठाण, प्रविण फरगडे, रत्नाकर वादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत