राहूरीतील मॅथ्यूज क्लिनिकल लॅबोरेटरीच्यावतीने १७ व १८ डिसेंबरला माफक दरात फुल बॉडी व फुल ब्लड तपासणी शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील मॅथ्यूज क्लिनिकल लॅबोरेटरीच्यावतीने १७ व १८ डिसेंबरला माफक दरात फुल बॉडी व फुल ब्लड तपासणी शिबीर

राहुरी(प्रतिनिधी)  राहुरी शहरातील मॅथ्यूज क्लिनिकल लॅबोरेटरीच्या ३६ व्या वर्षातील पदार्पण सोहळा व ख्रिसमसनिमित्त शनिवार १७ डिसेंबर व रविवार ...

राहुरी(प्रतिनिधी)



 राहुरी शहरातील मॅथ्यूज क्लिनिकल लॅबोरेटरीच्या ३६ व्या वर्षातील पदार्पण सोहळा व ख्रिसमसनिमित्त शनिवार १७ डिसेंबर व रविवार १८ डिसेंबर या कालावधीत माफक दरात फुल बॉडी चेकअप व फुल ब्लड चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 



राहुरी येथील शुक्लेश्वर चौकातील बोरुडे कॉम्प्लेक्स येथील मॅथ्यूज क्लिनिकल लॅबोरेटरीच्या ३५ वा वर्धापनदिन व ख्रिसमस सणाचे औचित्य साधून शनिवार १७ डिसेंबर व  रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत फुल बॉडी चेकअप व फुल ब्लड चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात अंत्यत माफक दरात तपासणी होणार आहे.



 फुल बॉडी चेकअपमध्ये ६१ प्रकारच्या टेस्टस होणार असून यासाठी ऐरवी ५००० रुपये तपासणी फी आकारली जाती. मात्र या शिबिरात केवळ १८०० रुपयात पूर्ण शरीर तपासणी केली जाणार आहे.


तसेच फुल ब्लड चेकअपमध्ये २७ प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार असून या तपासणीसाठी ऐरवी २६०० रुपये खर्च मात्र या शिबिरात अवघ्या १२०० रुपयात तपासणी केली जाणार आहे.



ही तपासणी करण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांनी उपाशीपोटी यावे तसेच नावनोंदणीसाठी ९४२०६३९५२६, ९४२३४६१७७८, ९५५१५२३६३६  या     क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत