१ कोटी दे नाहीतर तुझा खून करू, नगर जिल्ह्यातील 'या' नेत्याला धमकी ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

१ कोटी दे नाहीतर तुझा खून करू, नगर जिल्ह्यातील 'या' नेत्याला धमकी !

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील रिपाईचे नेते राजाभाऊ कापसे यांना १ कोटीची खंडणी मागत खून करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याप्रकर...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर येथील रिपाईचे नेते राजाभाऊ कापसे यांना १ कोटीची खंडणी मागत खून करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी राजाभाऊ कापसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


     श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की,   मोबाईल नंबर 79201542876 व 97300 28661 या नंबर वरील आरोपीने राजाभाऊ कापसे यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून “तू १ कोटी रुपये खंडणी दे नाहीतर तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली.


 या प्रकरणी राजाभाऊ  कापसे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात वरील दोन मोबाईल धारक आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 387 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो.नि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. बोरसे हे  करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत