राहुरीच्या ‘त्या’ सोनोग्राफी केंद्रावर सुडबुद्धीने झालेली कारवाई मागे घ्यावी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीच्या ‘त्या’ सोनोग्राफी केंद्रावर सुडबुद्धीने झालेली कारवाई मागे घ्यावी

राहुरी(वेबटीम)  हजारो गरजू महिलांना मोफत व अल्पदरात आरोग्यसेवा देणाऱ्या राहुरी येथील साईधाम हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रावर सुडबुद्धीने व ...

राहुरी(वेबटीम)



 हजारो गरजू महिलांना मोफत व अल्पदरात आरोग्यसेवा देणाऱ्या राहुरी येथील साईधाम हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रावर सुडबुद्धीने व शुल्लक कारणावरुन कारवाई करण्यात आल्याचा आरोप करुन, स्थानिक सर्वसामान्य कुटुंबातील महिलांन आरोग्यसेवा मिळण्यासाठी कारवाई मागे घेण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिपाईच्या राहुरी तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिपाईच्या महिला जिल्हाध्यक्षा सिमाताई बोरुडे, सारिका बडेकर, मंदा बनसोडे, प्रियंका सगळगिळे, उषा सगळगिळे, निलम सगळगिळे, वंदना सगळगिळे, तेरेसा सांगळे, वंदना सांगळे, रेखा सगळगिळे, रेखा सांगळे, रोहिणी सगळगिळे, लता जगधने, लक्ष्मी जगधने आदींसह महिला उपस्थित होत्या.    

       राहुरी तालुक्यात डॉ. माने मेडिकल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे साईधाम हॉस्पिटल मागील ११ वर्षापासून कार्यरत आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोफत व माफक दरात सेवा देण्यात येतात. या संस्थेने जवळपास ३८० आदिवासी महिलांना मोफत उपचार दिले आहेत. ग्रामीण, दुर्गम डोंगराळ भागात मोफत शिबिरांच्या माध्यमातून ८८ हजार रुग्णांचे मोफत उपचार केलेले आहेत. ६ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी यांनी ऑनलाइन निनावी तक्रारीच्या अनुषंगाने अचानक हॉस्पिटलला भेट दिली व हॉस्पिटलचे रेकॉर्ड तपासून स्पॉट पंचनामा न करता रेकॉर्ड घेऊन गेले. २ ऑगस्ट २०२२ रोजी गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत कारणे दाखवा नोटीस हॉस्पिटलला पाठविण्यात आली. यामध्ये डॉक्टरांनी अ‍ॅप्रोन घातला नाही, कागदोपत्री झालेल्या अतिशय शुल्लक चूका दर्शवून 5 दिवसाच्या आत खुलासा करण्याचे स्पष्ट केले. यामध्ये रेकॉर्ड बघण्याची मुभा दिली गेली नाही. ८ ऑगस्ट रोजी या नोटीसीला समाधान कारक खुलासा खुलासा देऊनही, २१ सप्टेंबर रोजी राहुरीचे वैदयकिय अधिक्षक यांनी साईधाम हॉस्पिटलचे दोन्ही सोनोग्राफी मशीन सील केले. कारवाई दरम्यान सोनोग्राफीचे पाच कॉलम रजिस्टर घेऊन गेले व त्याची ताबा पावती दिली गेली. चार दिवसांनी त्या रजिस्टरची मागणी करण्यात आली होती. यावरुन कारवाई सुडबुध्दीने झाली असल्याचा आरोप रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.



    या कारवाईत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कोणतेही नियमबाहय काम त्यांना सदर ठिकाणी आढळले नाही. तर एकही गर्भलिंग निदान केलेला व गर्भपाताचा रुग्ण आढळून आलेला नाही. या हॉस्पिटलद्वारे महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून व इतर सर्वसामान्यांना मोफत सेवा दिली जात असल्याने परिसरातील नागरिक याच ठिकाणी येऊन सेवा घेत होते. सामाजिक कार्य करण्यार्‍या डॉक्टरांचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक सुडबुद्धीने कारवाई केली गेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. साईधाम हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रात कायद्याचे उल्लंघन झालेले नसताना, सुडबुद्धीने व शुल्लक कारणावरुन झालेली कारवाई मागे घ्यावी तसेच सोनोग्राफी मशीन खुले करुन महिलांना सुविधा उपलब्ध करुन द्यावी, चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा २० डिसेंबर २०२२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत