धरणग्रस्त सेवा संघाचे येवला तालुका पदाधिकारी निवड जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धरणग्रस्त सेवा संघाचे येवला तालुका पदाधिकारी निवड जाहीर

  येवला(वेबटीम)  संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आ...

 येवला(वेबटीम)






 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे.

 


धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अँड. सिंड्रेला परेरा यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. यावेळी सागर सावंत उपस्थित होते.


 नूतन पदाधिकाऱ्यांत नाशिक जिल्हाध्यक्षपदी गणेश खळे यांची निवड करण्यात आली आहे. तर येवला तालुकाध्यक्षपदी दामू माळी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.


येवला तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी अलका जाधव यांची तर उपाध्यक्षपदी रेखा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली.


संपुर्ण महाराष्ट्र भर धरणग्रस्त सेवा संघ भूमिहीन, अल्पभूधारक, गायरान जमीन धारक, गोरगरीब , दिन दुबळ्या व शोषित समाजासाठी काम करत असून येवला तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांनी तळागाळातील नागरिकांशी संपर्क करून त्यांना या प्रवाहात समविष्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र अध्यक्षा अँड. सिंड्रेला परेरा यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत