राहुरी(वेबटीम) स्वयंपाक करत असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिच्या विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात दाखल असलेल्या जातप येथील एकास राहु...
राहुरी(वेबटीम)
स्वयंपाक करत असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिच्या विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात दाखल असलेल्या जातप येथील एकास राहुरी न्यायालयाने दोषी धरून १ वर्ष ६ महिन्याचा सक्त कारावास व ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. आरोपीने दंड ब भरल्यास १ महिना साधा कारावासची शिक्षा सुनावली आहे
३० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक महिला एकटी स्वयंपाक करत असताना राहुरी तालुक्यातील जातप येथील समीर जुबेर सय्यद हा घराचे रंग देण्याचे काम करत होता महिला घरामध्ये एकटी असण्याचा फायदा समीर याने तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.फिर्यादी महिलेने आरडाओरडा केल्याने फिर्यादीचा भाचा हा घरात पळत आला व त्याला पाहून आरोपी समीर सय्यद हा पळून गेला.
या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सविता सदावर्ते यांनी काम पाहिले.
दरम्यान राहुरी न्यायालयात सरकारी वकील प्रमोद वाघ यांनी पाहिले व भैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक भवार व पोलीस कॉन्स्टेबल ताके यांनी काम पाहिले.
या प्रकरणी आरोपी समीर सय्यद यास राहुरी न्यायालयाने दोषी धरून १ वर्ष ६ महिन्याचा सक्त कारावास व ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. आरोपीने दंड ब भरल्यास १ महिना साधा कारावासची शिक्षा सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत