'त्या' प्रवृत्तीमुळे २०१९ ला 'त्यांना' जनतेने नाकारले आता २०२४ ला पुनरावृत्ती होईल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'त्या' प्रवृत्तीमुळे २०१९ ला 'त्यांना' जनतेने नाकारले आता २०२४ ला पुनरावृत्ती होईल

     राहुरी(वेबटीम) ज्यांनी कायदे बनविण्याचे काम केले. २५ वर्षे आमदार राहिले. त्यांनी स्वपक्षाच्या माजी खासदाराच्या मुलाला धमकी दिली. त्याची...

   राहुरी(वेबटीम)


ज्यांनी कायदे बनविण्याचे काम केले. २५ वर्षे आमदार राहिले. त्यांनी स्वपक्षाच्या माजी खासदाराच्या मुलाला धमकी दिली. त्याची क्लिप व्हायरल झाली. त्यात, दोन-चार केसेस झाल्या. तरी हरकत नाही. अशी कायद्याला जुमानत नसल्याची मुजोर भाषा वापरली. त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांना २०१९ साली जनतेने नाकारले.  त्याचीच पुनरावृत्ती २०२४ साली होईल असे प्रतिपादन राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले




      चिंचविहिरे येथे मंगळवारी वाढीव पाणी योजना व स्मशानभूमीतील विकास कामांचा शुभारंभप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते.  अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पठारे होत्या.  उपसरपंच जयराम गिते, विजय नरोडे, राजेंद्र नालकर, दगडू गिते, हुसेन पठाण, बाळासाहेब नरोडे, एकनाथ नालकर, साहेबराव पठारे, राजेंद्र गरुड, नामदेव पानसंबळ, सुखदेव नरोडे, शब्बीर पठाण उपस्थित होते.

       आमदार तनपुरे म्हणाले, "जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील नवीन पाणी योजनांसाठी दीड वर्षे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे, मिरी-तिसगाव सारख्या मोठ्या योजनेसह चिंचविहिरेची पाणी योजना मार्गी लागली आहे. अतिवृष्टीचे पंचनामे झाले. परंतु शासनाची आर्थिक मदत लाभार्थ्यांना मिळालेली नाही. या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणार आहे."



       "निळवंडेच्या कालव्यांना भाजपाच्या काळात पाच वर्षात जेवढा निधी मिळाला. तेवढा महाविकास आघाडीने प्रत्येक वर्षी कोरोना महामारी असतांना दिला. कालव्यांची कामे वेगाने चालू होती. त्यावेळी उजव्या कालव्याचा शेवटचा भाग बंद जलवाहिनीचा नको, खुला कालवा करावा. अशी भाषणे ठोकणार्‍यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना, जलसंपदा मंत्र्यांनी बंद कालवाच होईल. असे सुनावले. परंतु, कालव्यांची कामे बंद पडल्याने त्यांना गप्प बसावे लागले आहे."

       "सरकारचे कायदे लोकांसाठी असतात. गौण खनिज अभावी विकास कामे ठप्प होत असतील. तर असे कायदे बदलले पाहिजेत." असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत