चांदेकसारे पंचवार्षिक निवडणुकीत परजणे गटासह शिवसेनेचा काळे गटाला जाहीर पाठिंबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चांदेकसारे पंचवार्षिक निवडणुकीत परजणे गटासह शिवसेनेचा काळे गटाला जाहीर पाठिंबा

सोनेवाडी(वेबटीम)  कोपरगाव तालुक्यातील चांदेकर सारे ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत असून काळे विरुद्ध कोल्हे गटाचे नेतृत्व गावातील का...

सोनेवाडी(वेबटीम)



 कोपरगाव तालुक्यातील चांदेकर सारे ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत असून काळे विरुद्ध कोल्हे गटाचे नेतृत्व गावातील कार्यकर्ते करत होते मात्र परजणे गटाचा पाठिंबा कोणाला याकडे कालपर्यंत सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज शुक्रवारी परजणे गटाचे नेते सुभाषराव रामदास होन यांनी काळे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने व शिवसेनेनेही आपला पाठिंबा काळे गटाला दिल्याने  या निवडणुकीमध्ये सुरस वाढली आहे.



कालपर्यंत परजणे गट कोल्हे गटाला पाठिंबा देणार असल्याचे चित्र दिसून येत होते मात्र अचानक सुभाष होन यांनी स्थानिक गावातील राजकारणात स्पिन बॉल टाकत आपला पाठिंबा काळे गटाला जाहीर केला. त्यामुळे तालुक्यात असलेल्या कोल्हे परजणे युती चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र

काळे परजणे युती असल्याचे स्पष्ट झाल्याने आता मात्र चांदेकसारे ग्रामपंचायतीची निवडणूक रंगत वळणावर येऊन ठेपली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सध्याचे उमेदवार असलेले किरण होन पत्नीने पराभव स्वीकारला होता. आता त्या पराभवाची परतफेड चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा करेल का असे चित्र दिसत आहे. असे जरी असले तरी कोल्हे गटाकडून

या निवडणुकीमध्ये अशोक होन यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी देखील प्रचारात बरोबरी केली असून या निवडणुकीमध्ये उमेदवार सध्या चुरस लागली आहे. काल पुन्हा एकदा परजणे गटाने आपला पाठिंबा काळे गटाला दिल्याने काळे गटाची ताकद वाढल्याने

कोल्हे गटाला निवडणुकीमध्ये मोठी झुंज द्यावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत