प्रहार श्रमिक संघा कडून कडून असंघटित कामगारांना न्याय मिळण्याची खात्री - उद्धव महाराज मंडलिक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रहार श्रमिक संघा कडून कडून असंघटित कामगारांना न्याय मिळण्याची खात्री - उद्धव महाराज मंडलिक

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:- प्रहार श्रमिक सेवा संघाकडून राज्यातील असंघटित कामगारांना नक्की न्याय मिळेल याची खात्री आहे असे उदगार लोणी येथील व...

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:-

प्रहार श्रमिक सेवा संघाकडून राज्यातील असंघटित कामगारांना नक्की न्याय मिळेल याची खात्री आहे असे उदगार लोणी येथील वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांनी देवळाली प्रवरा येथील प्रहार श्रमिक सेवा संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी काढले..

      प्रसंगी बोलताना उद्धव महाराज पुढे म्हणाले की, देवळाली प्रवरा येथील प्रहारचे वतीने विधवा भगिनी, तसेच प्रसादनगरला पाणी, देवळाली प्रवरा येथील लोखंडी पुल, विधवा महिलांना शिलाई मशीन आदी समाज उपयोगी कार्य केल्याने यापुढेही कामगारांसाठी प्रहार श्रमिक सेवा संघ उत्कृष्ट कार्य करेल याची आम्हाला खात्री वाटते.

       प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी सांगितले की, शेटेवाडी परिसरात हारगुडे वस्ती येथील पुलासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या चौथ्या लोखंडी पुलाचे काम सुरू होणार आहे तसेच देवळाली प्रवरा हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत देवळाली प्रवरा मधील भटक्या आणि विमुक्त समाजाच्या नागरिकांसाठी मोफत घरकुलांची योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रहार च्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे व लवकरच त्यांना मोफत घरकुलांची सोय होणार आहे. 

     प्रसंगी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले यांनी सांगितले की देवळाली प्रवरा येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामात खोडा घालण्याचे काम कोणी केले तर आम्ही त्यास प्रहार स्टाईलने उत्तर देऊ.

     प्रसंगी बोलताना देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने देवळाली प्रवरा येथील असंघटित बांधकाम कामगारांना सहा लक्ष रुपये किमतीचे सुरक्षा साहित्य वाटप केल्याबद्दल संघाचे कौतुक केले व अशा पद्धतीने कामगारांनी या संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.

      प्रहार जणशक्ती पक्षाचे जिल्हा कायदा सल्लागार पांडुरंग अवताडे यांनी प्रहार श्रमिक सेवा संघाला शुभेच्छा दिल्या. 

       देवळाली प्रवरा येथील माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या असंघटित कामगारांना तसेच इतर कामगारांना देण्यात येणाऱ्या शासकीय सवलतींबद्दल माहिती देऊन त्याचा जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प उद्धव महाराज मंडलिक तसेच प्राची जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील प्रहार चे जिल्हा कायदेशीर सल्लागार पांडुरंग अवताडे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, सोशल मीडिया सेलचे जिल्हाप्रमुख संजय वाघ, प्रहार श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार देवळाली प्रवरा शहराध्यक्ष शरद वाळुंज, प्रहार देवळाली प्रवरा कामगार सेलचे प्रमुख किरण पंडित, प्रहार देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, कामगार सेलचे आदिनाथ भालेकर, प्रहार देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्ष भाग्यश्री कदम, प्रहार राहुरी फॅक्टरी  महीला शहराध्यक्ष रजनी कांबळे, उपाध्यक्ष अशा माळी, अफसाना शेख, लैला शेख, वंदना कांबळे, प्रभाकर कांबळे, तसेच देवळाली प्रवरा येथील प्रहार चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सह प्रहार श्रमिक सेवा संघाचे सदस्य अशोक सकट, दिगंबर तावरे, सुमया शेख, कल्पना देवगिरे, विजया घुले, आदींसह असंघटित बांधकाम कामगार पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रम प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक व अभिजित दादा पोटे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रहार श्रमिक सेवा संघाच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी नवनाथ चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

     तसेच देवळाली प्रवराचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेश मंचरे यांची निवड करून त्यांनाही मान्यवरांच्या असते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

     त्याचबरोबर प्रहार च्या वतीने पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवराचे सुपुत्र संदीप संसारे यांचा मनोरंज असते  सत्कार सत्कार करण्यात आला. 

    या कार्यक्रम प्रसंगी प्रहार प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने ६० कामगारांना सहा लक्ष रुपयांचे सुरक्षा साहित्याचे वाटप मनावर जास्त करण्यात आले..

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी केले तर सूत्रसंचालन देवळाली प्रवरा प्रहारचे प्रसिद्धी प्रमुख राजेश मंचरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत