सात्रळ(वेबटीम) येथील रयत शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पद्मविभूषण मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्...
सात्रळ(वेबटीम)
येथील रयत शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पद्मविभूषण मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाची सांगता रयत संकुल सात्रळ येथे करण्यात आली. प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या प्रमुख भाषणात व्याख्याते, ज्येष्ठ पत्रकार,जलतज्ञ व राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी आपल्याला तहान लागल्याशिवाय पाण्याचे महत्त्व कळत नाही पाणी हेआपलं पूर्ण जीवन आहे. आणि पाण्याशिवाय अन्नपूर्ण होऊ शकत नाही हे नमूद केले तसेच पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या गोष्टीची जाणीव आपल्या सर्वांना होते.शरद पवार साहेब देशाचे कृषीमंत्री असताना अन्नधान्याच्या उत्पन्नाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला . पूर्वी अन्नधान्य आयात करणारा देश आज निर्यात करणारा देश ठरला आहे शेती व इतर बाबींवर त्यांचे कटाक्षाने लक्ष होते. एकेकाळी आपल्या देशात अन्नधान्याचा जेव्हा तुटवडा होता, त्यावेळी शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना अन्नधान्याचा साठा वाढवून आपल्या भारत देशाला अन्नधान्य प्रश्नी स्वयं:पुर्ण केले.
शरद पवार यांची खासियत अशी की ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधून शेतक-यांचे व गोरगरीबांचे दुःख जवळून अभ्यासतात, म्हणूनच शरद पवार हे शेतकऱ्यांचे खरे देवदूत आहे.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व मान्यवर परिचय रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी करून दिला यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला थोरा मोठ्यांची परंपरा लाभलेले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद माननीय शरद पवार साहेबांनी यशस्वी भूषविले आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विद्यार्थी शिक्षक व संस्था यासाठी अनेक यशस्वी उपक्रम राबविले आहेत.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कृषी भूषण पुरस्कार प्राप्त लोणी ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रभाताई घोगरे यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा आदी अशा विविध क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास विशद केला. या कार्यक्रमास प्रगती पतसंस्थेचे चेअरमन विजयराव कडू ,बबनराव कडू, कॉ.गंगाधर जाधव, भास्कर फणसे,प्राचार्य राजेंद्र बर्डे ,दिनकरराव कडू ,माजी प्राचार्य मधुकर अनाप, बाळासाहेब सिनारे, गोरख बाबा अंत्रे,दत्तात्रय कुलकर्णी राजेंद्र कडू ,प्रभाकर पलघडमल ,नंदू भाऊ कडू रघुनाथ नालकर गणेश पा.कडू भाऊसाहेब पेटकर, सुनीताताई कोरडे , सागर डुकरे ,सागर कडू विक्रांत कडू ,अतुल कडू बापूसाहेब दिघे,अशुतोष कडू संदेश सीनारे,अण्णासाहेब सिनारे अहमद,भाई शेख रमाकांत गागरे,सुभाष कडू, संकुल चे प्राचार्य ससाने सर मुख्याध्यापिका,निबे मॅडम, पर्यवेक्षिका थोरात मॅडम विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सुरी, विलास व योगिता खपके यांनी केले तर विक्रांत कडू यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत