आंबी(वेबटीम) गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहेत केशव गोविंद बन ते केसापूर दरम्यान बिबट्या...
आंबी(वेबटीम)
गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहेत केशव गोविंद बन ते केसापूर दरम्यान बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पहावयास मिळत आहे. येथील केशव गोविंद बन व केसापूर सीमारेषेवर असलेल्या सुनिल पुजारी यांच्या केळीच्या बागेजवळ बिबट्या दबा धरून बसतो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा हल्ल्याच्या बेताने पाठलाग करत असल्याने वाहन चालकांची भंबेरी उडत आहे.
असाच प्रकार केसापूर येतील दोन तरुणांच्या वाट्याला आला. केसापूर येथील सोसायटीचे व्हा. चेअरमन आकाश रणदिवे व बंधू योगेश रणदिवे हे गुरुवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे परतत असताना केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग करून हल्ला केला. दैव बलवत्तर म्हणून प्रसंगावधान दाखवत आकाश रणदिवे यांनी गाडीचा स्पीड वाढवत भरधाव वेगाने केसापूर गाठले व सुटकेचा निश्वास सोडला.
सदर परिसरात व नदीच्या कडवक मोठ्या प्रमाणात लपण्यासाठी जागा असल्याने बिबट्यांना नित्य संचार आहे. बेलापूर ते आंबी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने शेतकरी, दुग्धव्यवसाय करणारे, नोकरदार, विद्यार्थी यांचा मोठा वावर आहे. तसेच जिल्ह्यात नावाजलेले केशव गोविंद मंदिर येथे भक्तांचा मोठया प्रमाणात वावर आहे. सकाळी व संध्याकाळी अनेक भक्त पायी जाऊन दर्शन घेत असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या भागात तात्काळ पिंजरे लावून या बिबट्यास जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत