देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा- कारखाना रोड वाणी-सांबारे वस्तीवरील एका शेतात आज रविवारी सकाळी बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा- कारखाना रोड वाणी-सांबारे वस्तीवरील एका शेतात आज रविवारी सकाळी बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले आहे
सांबारे वस्तीवरील एका शेतात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी वनाधिकारी यांना दिली. त्यानुसार वन क्षेत्रपाल वाय.जे. पाचरने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री.रायकर, वनरक्षक एस.एस.जाधव , एस.एस.चव्हाण, श्री.गाडेकर, वन कर्मचारी श्री.कोहकडे,श्री.गायकवाड व श्री.शेळके घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या ठिकाणी रानडुक्कराच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यानंतर मृत बिबट्यास शासकीय वाहनातून बारागाव नांदूर येथील शासकीय रोपवाटिका येथे नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी श्री.वाकडे यांनी शवविच्छेदन केले. त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार रानडुकराच्या हल्ल्यात सदर बिबट्या मयत झाला असावा असे कळविले आहे. त्यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत