अंमळनेर, शिरेगांव ग्रामपंचायत निवडणूक चुरशीच्या लढतीत विजय कुणाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अंमळनेर, शिरेगांव ग्रामपंचायत निवडणूक चुरशीच्या लढतीत विजय कुणाचा

पानेगांव (वार्ताहर)  नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांचा...

पानेगांव (वार्ताहर)



 नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांचा दोन्ही गावांमध्ये त्यांच्याच गटात सरळ लढत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक चुरश निर्माण झाली असून वरील दोन्ही गावाच्या उमेदवारांनी विजय आपलाच असा दावा केला आहे.




अंमळनेर येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश भांगे  यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदान १६८७ पैकी १४६४ मतदारांनी हक्क बजावला.लोकनियुक्त सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाचे अच्युतराव घावटे,विरोधी गटाचे ज्ञानेश्वर आयनर यांच्यात सरळ लढत होत आहे.तर सदस्य पदासाठी ९ जागेसाठी १८उमेदवार रिंगणात आहे.

शिरेगांव येथे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदान२१७२ पैकी १७९७ मतदारांनी हक्क बजावला. लोकनियुक्त सरपंच निरंजन तुवर हे बिनविरोध निवड झाली आहे . सदस्य पदासाठी ९जागे साठी १९उमेदवार रिंगणात आहे.  

यावेळी शिरेगांव येथील बिनविरोध निवड झालेले निरंजन तुवर यांनी सांगितले की,मी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली काम करत असून माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील व सभापती सुनिलभाऊ गडाख यांनी गावच्या विकासासाठी जो भरघोस निधी दिला.असंच काम त्यांचा मार्गदर्शनाखाली करण्याची संधी शिरेगांवच्या जनतेने दिली त्याबद्दल त्रणी असल्याचे सांगितले.

सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव भाऊसाहेब चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार काकासाहेब राख, विठ्ठल थोरात, मृत्युंजय मोरे तुपेदादा,तमनरदादा, पोलीस मुख्यालतील जायभायदादा ,पालवेदादा सह सहा होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मतमोजणी नेवासे तहसील कार्यालयात मंगळवार दिनांक २१ रोजी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत