कन्नड व वैजापूर तालुक्यातील गायरान जमीन धारकांसाठी धरणग्रस्त सेवा संघाने केली' ही' मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कन्नड व वैजापूर तालुक्यातील गायरान जमीन धारकांसाठी धरणग्रस्त सेवा संघाने केली' ही' मागणी

राहुरी(वेबटीम) औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्हातील वैजापूर, गंगापूर व कन्नड तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील कसीत असलेले गायरान शेतजमीन ...

राहुरी(वेबटीम)




औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्हातील वैजापूर, गंगापूर व कन्नड तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील कसीत असलेले गायरान शेतजमीन सदर शासकीयदरात १ ई रजिष्टरला त्याच्या नोंदी असून त्यांच्या नावावर ७/१२ व रेकॉर्ड प्रमाणे मोजमाप करून मिळावे अशी मागणी धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.



  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, कन्नड व वैजापूर तालुक्यातील  भूमिहीन, बेघर, प्रकल्पपीडित, अतिक्रमणीत, शेतमजूर, गावरणधारक (अतिक्रमणीत ) सर्व सामान्य शेतकरी, शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार, महिला बेरोजगार, विधवा, आदिवासी, अपंग व समाज पीडित्याच्या जीवन जगण्याच्या निगडीत असलेले ज्वलंत व प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे म्हणून न्याय मागत आहे.


सदर चुकून राहिलेले अतिक्रमणीत गायराणधारक यांच्या पण कसीत असलेली शेती व राहत असलेले घर  १ ई रजिस्टर नोंद करून सदर त्यांचा ७/१२ तयार करून मोजमाप करून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत