श्रीरामपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता प्रथमत:च स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पु...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता प्रथमत:च स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार देण्याचे ठरविले होते. जे अधिकारी क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करतील अशा अधिकाऱ्यांची यामध्ये निवड होणार होती. यामध्ये पालघर येथील नगररचना सहायक संचालक संग्राम लहू कानडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नरिमन पॉईंट, मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
संग्राम कानडे हे सहाय्यक संचालक आहेत. संग्राम कानडे हेही उत्कृष्ट अधिकारी पालघर जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स नवी दिल्ली) येथून नगररचना विभागात पदव्युत्तर पदवी संपादित केली असून एमबीए पदवी घेतली आहे. संग्राम कानडे यांनी जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड व वाडा या पाच नगरपंचायती / नगरपरिषदांसाठी जीआयएस प्रणालीवर आधारित विकास योजना विक्रमी वेळेत पूर्ण केल्या आहेत.
त्यांनी राबविलेल्या विविध कामांची दखल घेऊन राज्य शासनाने यावर्षीचा पहिला स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी हा पुरस्कार जाहीर केला आहे. संग्राम कानडे हे आ. लहू कानडे यांचे सुपुत्र आहेत. आ. कानडे पूर्वी सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले म्हणून कार्य करीत आहेत.
या पुरस्काराबद्दल जिल्हा काँग्रेसचे सचिव अजय खिलारी, अमोल पवार, बाळासाहेब आढाव, राजेंद्र लोखंडे, राजेंद्र बोरुडे, दीपक ढुस, गजानन घुगरकर, सचिन निमसे, संदीप महाडिक, विलास पवळ, संदीप मुसमाडे आदिंसह राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील मित्र परिवाराने अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत