अहमदनगर(वेबटीम) गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे,...
अहमदनगर(वेबटीम)
गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे, वास्तविकता नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीपूर्वी नगर दौऱ्यावर आलेले अजितदादा, त्यानंतर ऐनवेळेला फुटलेले राष्ट्रवादीचे संचालक , त्यातून बहुमत असूनही भाजपकडे गेलेली सत्ता आणि विशेष म्हणजे फुटलेले संचालक हे दादांना मानणारे असल्याचा राजकीय विश्लेषकांनी काढलेला निष्कर्ष हा अजित पवार यांचा भाजप प्रवेशाची वाटचालीची नगरमधून दिशा ठरल्याची चर्चा रंगली आहे.
नगर जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. महाविकास आघाडीचे 14, तर भाजपचे 6 संचालक होते, असे असताना राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना 9 तर भाजपडून शिवाजी कर्डीले यांना 10 मते मिळाली.
यात राष्ट्रवादीचे मते फुटली होती, मात्र कशी फुटली याचे उत्तर अजूनही घुले समर्थक तसेच नगरकर शोधत असतानाच आता अजित पवार यांची भाजसोबत जाण्याची चर्चा बाहेर आली आहे. त्यामुळे बँकेत झालेली जादू कोणी केली, याविषयी देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यात जिल्हा बँक निवडणुकीत स्वतः फडणवीस यांनी लक्ष घातले होते, रात्री काही फोनही फिरवले होते, मात्र ते फोन कोणासोबत होते, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. तर अजित दादा नगरला येऊन, 14 संचालक समवेत बैठक घेऊन 5 लोक फुटली कशी, याची उत्तरेही अद्याप मिळालेली नाही, मात्र अजित दादा कदाचित भाजपसोबत गेलेच तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत हे मात्र नक्की.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत