राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे आज दुपारच्या दरम्यान अज्ञात वाहनाची धडक बसून दुचा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे आज दुपारच्या दरम्यान अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. मृत दोघांची सायंकाळी ओळख पटली दोघे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ते सध्या राहुरी फॅक्टरी येथील चिंचोली फाटा परिसरात रोजंदारीवर काम करत होते.
आज दुपारी एक ते दिड वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर एक पुरूष व एक महिला दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील ३५ ते ४० वयोगटातील एक पुरूष व एक महिला जागेवरच ठार झाले. धडक देऊन अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी काही नागरीकांनी रुग्णवाहिकेला फोन करुन पोलिस ठाण्यात माहीती दिली. उपस्थित नागरीकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह रूग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मृतदेहा जवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने तसेच त्यांचा मोबाईल फूटल्याने मृतदेहांची ओळख पटण्यास अडचण निर्माण होते.
सायंकाळी मृत दोघांची ओळख पटली असून त्यांची नावे पुष्पा शामराव ब्राम्हणे, वय-२७(ह.मुक्काम-चिंचोली फाटा, मूळगाव- रा.बोरगाव ता.धरणगाव, जि. जळगाव व योगेश राजेंद्र गायकवाड, वय-२२(ह.मुक्काम-चिंचोली फाटा, मूळगाव- रा.बोरगाव ता.धरणगाव, जि. जळगाव) असे असल्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. एन.गर्जे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत