देवळाली प्रवरा(वेबटीम) फुले, शाहू आंबेडकरी विचारांच्या तरूणांच्या सक्रियतेला आणि सृजनशीलतेला वाव देणारी, समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करू...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
फुले, शाहू आंबेडकरी विचारांच्या तरूणांच्या सक्रियतेला आणि सृजनशीलतेला वाव देणारी, समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करून नेतृत्व गुण विकसित करणारी, समाजाचे हित जपणारी व मानुसकी हीच जात आणि मानवता हाच धर्म मानणारे देवळाली प्रवरातील आंबी स्टोअर येथील भीमशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपर केंद्रीय शिक्षिका तज भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष श्रीरामपूर आयु. सरिता प्रकाश सावंत यांनी मार्गदर्शन केले.
समाजाला नाचून नाही तर वाचून प्रगती करा असा संदेश भीमशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास कॉ. शरद संसारे, कॉ. राजेंद्र मुसमाडे, कॉ.बाळासाहेब सुरूडे., कॉ. राजेंद्र बावके, अनिल पाटील कॉ. राजेंद्र मुसमाडे, कॉ. हसन शेख, तसेच भीमशक्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भाऊसाहेब घागरे, दादासाहेब राजगुरु, सागर गायकवाड, सुनिल घागरे, श्रीकांत राजगुरु, दिपक राजगुरु, अशोक गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, सुरेश राजगुरु आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत