राहुरी(वेबटीम) गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे...
राहुरी(वेबटीम)
गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या दरम्यान ते भाजपात जाऊन मुख्यमंत्री पदावर बसतील असेही तर्क वितर्क काढले जात आहे. दरम्यान यचर्चेबरोबर देवळाली प्रवरातील गणेश अंबिलवादे यांनी अजित पवार यांच्या कार्यावर संपादित केलेल्या 'मुख्यमंत्री पदाचे अस्सल दावेदार' या पुस्तकाची चर्चा राज्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियात होऊ लागली आहे.
देवळाली प्रवराचे गणेश अंबिलवादे यांनी अजित पवार हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर असताना 'मुख्यमंत्री पदाचे अस्सल दावेदार' हे पुस्तक संपादित करून ते प्रकाशित केले होते. या पुस्तकासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांची संकल्पना, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांचे सहाय्य तर अजित पवार यांचे खासगी सचिव अजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले होते. दस्तरखुद्द अजित पवार यांनी पुस्तकाचे संपादक गणेश अंबिलवादे यांचे कौतुक केले होते.
दरम्यान अजित पवार हे भाजपात जाणार असून मुख्यमंत्री पदावर बसतील अशी चर्चा सुरू असताना देवळालीच्या अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या मुख्यमंत्री पदाचे अस्सल दावेदार या पुस्तकाची राज्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियात चर्चा होत आहे.
महिला पत्रकार अलका धुपकर यांनी आपल्या फेसबुक पेज 'मुख्यमंत्री पदाचे अस्सल दावेदार ' या पुस्तकाचे कव्हर पेज पोस्ट केली असून त्यात म्हंटले की, हे जुने पुस्तक आहे. मी गेल्या वर्षी मी गेल्या वर्षी रिपोर्टंगसाठी बारामतीला गेले होते तिथे निवासाची सोय असलेल्या होस्टेलमध्ये हे दिसलं. तेव्हा फोटो काढून ठेवला. सहज आठवलं म्हणून शेअर करतेय अस म्हंटले आहे.
त्यानंतर आज दैनिक लोकमत वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात लोकमत ब्युरोचे संपादक आशिष जाधव यांनी या पुस्तकाचा संदर्भ घेऊन चर्चा केली आहे.
लोकमत चर्चासत्र व्हिडीओ
एकंदरीत अजित पवारांच्या भाजप प्रवेश चर्चा, मुख्यमंत्री पदाबाबत तर्क वितर्क बरोबरच देवळालीतील पत्रकार गणेश अंबिलवादे यांनी अजित पवार यांच्यावर संपादित केलेल्या 'मुख्यमंत्री पदाचे अस्सल दावेदार ' पुस्तकाची जोरदार चर्चा माध्यमात सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत