राहुरी(वेबटीम) महाराष्ट्रातील भटक्या दिन दुबळ्या विमुक्त, भिल्ल, पारधी, एस. सी, न्हावी समाज, नाथपंथी गोसावी व गरीब गरजू लाभार्थ्यांसाठी राहण...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्रातील भटक्या दिन दुबळ्या विमुक्त, भिल्ल, पारधी, एस. सी, न्हावी समाज, नाथपंथी गोसावी व गरीब गरजू लाभार्थ्यांसाठी राहण्यासाठी व कुटुंब उदर निर्वाह करण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांनी केली आहे.
अँड. सिंड्रेला परेरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले कि, महाराष्ट्रातील भटक्या दिन दुबळ्या विमुक्त जाती जमाती व गरीब गरजू लोकांसाठी घरकुल व कुटुंब उदर निर्वाहासाठी शासनाची असलेली गायरान जमीन व गावठाण अंतर्गत किवा ग्रामपंचायत अंतर्गत असलेली जागा घरकुलासाठी व त्यांच्या कुटुंब उदर निर्वाहासाठी जागेची तरतूद करण्यात यावी कारण आपल्या महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती त्यामध्ये भिल्ल, एस. सी, घिसाडी, किंवा अन्य इतर गरजू हे आपल्या कुटूंबासाठी खासगी किंवा सडक जागेवर पाल मारुण कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु वारे वादळ पाऊस यापासून त्यांचे पक्के घरे नसल्यामुळे व त्यांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना घर बांधण्यासाठी व कुटूंब उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणी येत असल्याचे पेरता यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत