अहमदनगर(वेबटीम) वाहतूक कोंडीवर कोतवाली पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची योग्य पार्किंग होईल, अशा अंतरा...
अहमदनगर(वेबटीम)
वाहतूक कोंडीवर कोतवाली पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची योग्य पार्किंग होईल, अशा अंतरावर दोरी लावण्यात आली आहे. पार्किंगच्या कारणावरून नागरिकांमध्ये वाद होऊ नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या उपाययोजना प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात नागरिकांची दररोज मोठी गर्दी असते. दुकानांबाहेर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांना अडचण होते. बाजारात होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी कोतवाली पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. कापड बाजारात वाहने लावण्यावरून वादविवाद होऊ नये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेत रस्त्याच्या दुतर्फा दोरी बांधून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन-
नागरिकांनी आपली वाहने दोरीच्या आता लावावी जास्तीची वाहने कोहिनूर दुकानाचे शेजारील इमारत कंपनी येथे लावावीत. व्यापारी यांनी सुद्धा आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वाहने दोरीच्या आत लावण्यास सांगावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. तसे बोर्ड ही लावण्यात येणार आहेत.
रस्त्याने घेतला मोकळा श्वास-
कापड बाजारातील गर्दीमुळे रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. शुक्रवारी सकाळपासून कोतवाली पोलिसांनी कापड बाजारात आलेल्या नागरिकांना दोरीच्या आत वाहने लावण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनी दोरीच्या आत वाहने लावून सहकार्य केल्याने कापड बाजारातील रस्ता मोकळा झाला आहे. पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतः हजर राहून सूचना केल्या.
व्यापाऱ्यांनी मानले आभार
कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेऊन नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा दोरी बांधण्याचा निर्णय घेतला. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून व्यापारी वर्गाने कोतवाली पोलिसांचे आभार मानले आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून व प्रयत्नातून कापड बाजारात आज आलेल्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेल्या रस्सी मुळे कापड बाजारातील सर्व ग्राहकांच्या व व्यापाऱ्यांच्या गाड्या या रस्सी च्या आत लागल्याने बाजारपेठेत ईद ची गर्दी असून ही संपूर्ण रित्या सार्वजनिक रस्ता मोकळा होता व ग्राहकांना कोणत्याही अडचणीला सामोरे न जाता मनमुराद खरेदीचा आनंद लुटता आला. यादव साहेबांच्या या प्रयत्नाचे व्यापारी व ग्राहकांच्या सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे व बाजारपेठे तर्फे त्यांचे आभार.
-ईश्वर बोरा, अध्यक्ष, अहमदनगर व्यापारी संघ
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस शिपाई अभय कदम, श्रीकांत खताडे, रिंकू काजळे, अशोक सायकर, योगेश खामकर, सतीश भांड यांनी ही कारवाई केली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत