नगर लोकसभेच ठरलं; राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांच्या नावावर मुंबईत चर्चा! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर लोकसभेच ठरलं; राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांच्या नावावर मुंबईत चर्चा!

  अहमदनगर/वेबटीम:- आज ११.१५ वाजता मुंबई येथे पार्टी कार्यालयात अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची महत...

 अहमदनगर/वेबटीम:-

आज ११.१५ वाजता मुंबई येथे पार्टी कार्यालयात अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची महत्वाची बैठक झाली.  खा शरदचंद्रजी पवार साहेब, आ जयंत पाटील, ना अजीतदादा पवार, आ छगन भुजबळ, खा सुनील तटकरे , खा श्रीनिवास पाटील, आ हसन मुश्रीफ व राज्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली 

जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र फाळके, आ प्राजक्त तनपुरे , आ संग्राम जगताप, माजी आ दादाभाऊ कळमकर, माजी आ राहुल जगताप, माजी आ चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर , राजेंद्र कोठारी हे उपस्थित होते 

बैठकी मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची चर्चा झाली लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी मागणी सर्वच जणांनी केली। यात प्रामुख्याने माजी आमदार नरेंद्र घुले, आ निलेश लंके,राजेंद्र फाळके,माजी आ अरुणकाका जगताप,दादाभाऊ कळमकर,घनःश्याम शेलार यांच्या नावांची चर्चा झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत