राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांचा उद्या बुधवार दि.३१ मे रोजी सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. राहु...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांचा उद्या बुधवार दि.३१ मे रोजी सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे.
राहुरी तालुक्यात निष्ठेने सेवा बजावून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाचे घडी बसवून शांतता आणि सलोखा राखण्यात पोलीस निरीक्षक निरीक्षक डांगे यांनी यश मिळविले असून ते सेवानिवृत्त होत असल्याने उद्या ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस निरीक्षक डांगे यांचा सेवापूर्ती सोहळा व राहुरी पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पोलीस ठाणे आवारात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, तहसीलदार चंद्रजित राजपूत आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत