देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे पार्वतीनंदन एंटरप्रायजेसच्या माध्यमातून एमएच-१७ केक & कॅफे दालनाचा उद्या मंगळवार ३० मे रोजी...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे पार्वतीनंदन एंटरप्रायजेसच्या माध्यमातून एमएच-१७ केक & कॅफे दालनाचा उद्या मंगळवार ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शुभारंभ आयोजित करण्यात आला.
देवळाली प्रवराचे सुपुत्र सुमित प्रकाश कदम यांनी संगमनेर येथे श्रमिक कृषी महाविद्यालयात बी.टेक फूड टेक्नॉंलॉजी पदवी संपादन केल्यानंतरआपल्या अनुभवाच्या जोरावर ग्राहकांना चविष्ट केक मिळावे या हेतूने गेल्या वर्षी देवळाली प्रवरा शहराती एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालन सुरू केले. या दालनात सर्व प्रकारचे शेप व फ्लेवर मधील केक ग्राहकांना देण्यावर भर दिला. या केकला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली.
राहुरी फॅक्टरी परिसरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव नगर-मनमाड रोड लगत असलेल्या विवेकानंद नर्सिंग होम गेट जवळ एमएच-१७ केक & कॅफे दुसरी शाखा सुरू करण्यात आली असून उद्या मंगळवार ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास श्रमिक उद्योग समूह व नवले दुधचे संचालक साहेबराव नवले, देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
नव्याने सुरू होत असलेल्या या दालनात रसमलाई केक,चोको चीप्स केक,काजू कतली केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,टेंडर कोकोनट केक,डच चॉकलेट केक,गुलाबजामुन केक,पायनॅपल केक,कुल्फी केक,मार्बल चॉकलेट केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,मँगो केक,बटरस्कॉच केक,स्ट्रॉबेरी केक तसेच कार्टुन केक तसेच डॉल केक, अॅनिव्हर्सरी केक, एन्गेजमेंट केक, फ़ोनडंट थिम केक,हार्टशेप केक,फोटो प्रिंट केक,पिनाटा केक,फोटो रोल केक,क्राऊन केक आदी उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे सर्व प्रकारचा व्हेज पिझा, व्हेज बर्गर,ग्रील्ड, नॉनग्रील्ड सँडविच, कोल्ड कॉफी व मिल्क शेक उपलब्ध असणार आहे.
तरी या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन सूर्यकांत कदम, प्रकाश कदम, निलेश कदम, अजिंक्य कदम, सुमित कदम व कदम परिवाराने केले आहे.
आधिक माहितीसाठी संपर्क-८८०५९३७५२४


कोणत्याही टिप्पण्या नाहीत