श्रीरामपूर(वेबटीम) पाटणी विद्यालयाने ७९ वर्षांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडवले. त्यामुळे पाटणी विद्यालय रत्नांची खाण म्हण...
श्रीरामपूर(वेबटीम)
पाटणी विद्यालयाने ७९ वर्षांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडवले. त्यामुळे पाटणी विद्यालय रत्नांची खाण म्हणून समाजामध्ये नावलौकिक मिळवला. असे गौरव पूर्ण उद्गार हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी विद्यालयाच्या ७९ व्या वर्धापनदिनी मनोगतात व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील पहिले माध्यमिक विद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलेले पाटणी विद्यालय अर्थात मॉडर्न हायस्कूल चा ७९ वा वर्धापन दिन हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेब जौक, मानद सचिव संजय जोशी, भि.रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे, क. जे. सोमैया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन विजय नगरकर, शां. ज. पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ, स्कूल कमिटीचे सदस्य पद्मनाभ जोशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी कर्मयोगी कै. दादा वामन जोशी व कै. शांतीलाल जवाहरलाल पाटणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यालय रंगीबेरंगी फुलांनी व फुग्यांनी सजवण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला अनेक माजी विद्यार्थी व माजी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत