देवळाली प्रवरात उद्या सोमवारी कॉ. मार्शलभाऊ संसारे यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन सभा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या सोमवारी कॉ. मार्शलभाऊ संसारे यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन सभा

देवळाली प्रवरा(वेबटीम)  लाल निशाण पक्ष व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियन यांच्यावतीने प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून कष्टकरी शेतकरी, भुमिहीन...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



 लाल निशाण पक्ष व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियन यांच्यावतीने प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून कष्टकरी शेतकरी, भुमिहीन, शेतमजूर, दलित, आदिवासी , भटके विमुक्त जाती - जमाती , अल्पसंख्याक व महिला साठी आयुष्य समर्पित कार्यकर्ता  दिवंगत कॉ. मार्शलभाऊ संसारे यांच्या २२ व्या स्मृती दिनानिमित्त सोमवार २९ मे रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे.


देवळाली प्रवरा येथील  बेलापूर रस्त्यावरील मार्शलनगर येथील कॉ. भि. र. बावके सभागृहात आयोजित कार्यक्रमासअहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरूडे,श्रमिक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके उपस्थित राहणार असून महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक संसारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.


  तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. रंगनाथ दुशिंग, कॉ.  शरद संसारे, कॉ. मदिना शेख व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे








 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत