जगाच्या पाठीवर भारतीय प्रशासन व्यवस्था अत्यंत कार्यक्षम समजली जाते तर स्काॅर्टलॅड यार्डच्या च्या पाठोपाठ महाराष्ट्र पोलीस दलही अत्यंत कर्त...
जगाच्या पाठीवर भारतीय प्रशासन व्यवस्था अत्यंत कार्यक्षम समजली जाते तर स्काॅर्टलॅड यार्डच्या च्या पाठोपाठ महाराष्ट्र पोलीस दलही अत्यंत कर्तव्यदक्ष आणि धाडसी समजला जाते. याच महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने कर्तव्य बजावून गुन्हेगारांचा बिमोड करून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात योगदान दिले आहे. या अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमधे राष्ट्रपती पदक प्राप्त अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कार्यक्षम आणि धाडसी पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या मेघशाम डांगे यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. राहुरी तालुक्यात निष्ठेने सेवा बजावून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाचे घडी बसवून शांतता आणि सलोखा राखण्यात त्यांनी यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक डांगे हे आज आपल्या पोलीस सेवेतुन सेवानिवृत्त होत आहेत. निमित्ताने त्यांच्या पोलीस सेवेतील कार्यक्षम कार्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
नगर जिल्ह्यात अत्यंत बागायत, राजकारण, सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत जागृत समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील दहिगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मेघशाम डांगे यांचा जन्म झाला आहे. अगदी बालपणापासून मेहनत करण्याचे गुण अंगी असल्याने डांगे त्या अभ्यासातून आपल्या प्रगल्पभेतेची चुणूक दाखवून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बी.कॉम नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते पोलीस उपनिरीक्षक पदावर पोलीस सेवेत रुजू झाले. राज्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ,अक्कलकुवा, पुणे, कोथरूड, अहमदनगर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. कायदा आणि सुव्यवस्था चे धडे गिरवून शांतता आणि सलोखा अबाधित ठेवला या भागात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा वरचष्मा असताना त्यांनी अंत्यंत बुद्धी कौशल्याने जबाबदारी सांभाळून आपली जबाबदारी धाडसपणाने पार पाडली.
दूरदृष्टी सामान्य जनता आणि देशाच्या प्रतिनिष्ठा ठेवून त्यांनी कार्यक्षेत्रात आपल्या निष्पाप सेवेतून लोकप्रियता मिळवली. ठाणे येथे स्थानिक गुन्हे शाखेत काम करताना त्यांनी अत्यंत गुन्हेगारीतील गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले. उल्हासनगर येथील कुख्यात राजा मुदलियार गॅंगवर त्यांनी मोक्का लावून गुडांना गजाआड करत गुन्हेगारी श्रेञात पोलीस खात्याचे दहशत निर्माण करून या उल्लेखनीय धाडसी कामगिरी केली.तसेच धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रमुख असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथील अति संवेदनशील पोलीस ठाण्यात त्यांनी आपला साडे तीन वर्षाचा कार्यकाल यशस्वी पुर्ण करत तेथील आदिवासी समाजात पोलीस प्रशासनाबाबत विश्वासाचे वातावरण तयार केले. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई येथील कारागृहातून कुख्यात गुंड गजानन मारणेची सुटका झाल्यानंतर त्याचे समर्थकांनी तीनशेहुन अधिक गाडय़ांची रॅली काढत गजानन मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. नवीमुंबई वरून थेट पुण्यापर्यंत अनेक प्रतिष्ठित देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हि मिरवणूक अडविण्याचे धाडस कोणीही केले नव्हते त्यावेळी मिडीयामधे पोलिसांसह सरकारवर टीकेचे झोड उठत असताना डांगे हे धाडसी अधिकारी पुढे आले त्यांनी पुणे कोथरूडमध्ये रॅली अडवली. या रॅलीत सुमारे १०० हुन अधिक गाड्या जप्त करत गजानन मारणेसह शंभरहून अधिक गुंडांना जेलमध्ये टाकले त्यांचे हे धाडस पाहून शहरी जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. त्यानंतर शाबासकीचे आणि कौतुकाचा वर्षाव पोलीस खात्यामध्ये त्यांनी मिळवला व पोलीस खात्याची प्रतिमा उजळून निघाली त्यांच्या या धाडसी कार्याची पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली त्याच पाठोपाठ असे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
अंधारात असलेल्या पोलीस खात्याला डांगे यांच्या रूपाने प्रकाशाचा तळपणारा तेजस्वी अधिकारी लाभला एकीकडे कोरोना महामारीच्या सामान्य जनतेला असताना त्यांना आधार देण्याचा काम डांगे यांनी केले.पुणे येथे अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असताना डांगे यांनी आपली जबाबदारी ओळखून ऑक्सिजनची देखील व्यवस्था केली त्यामधे अनेकांचे प्राण वाचले. अहमदनगर येथील पोलीस मुख्यालयात त्यांनी होम डिवाएसपी म्हणून काम पाहिले या कार्यकाळात त्यांनी येथील पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस अधिकारी निवासस्थान सुशोभीकरणाचे काम हाती घेतले.
त्याचबरोबर अनेकांच्या रखडलेल्या प्रमोशनाचे काम देखील त्यांनी तात्काळ पूर्ण केलं त्यामुळे येथील त्यांची कामगिरी देखील वाख॔नण्याजोगी होती त्यानंतर त्यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात झाली मात्र या ठिकाणी त्यांना काम करण्यासाठी अल्प काळ मिळाला या अल्पवधी काळामध्ये देखील त्यांनी येथील गुहा तसेच प्रिंप्री-वळण येथे दोन समाजामध्ये धार्मिक स्थळावरून सुरू असलेला वाद अत्यंत संवेदनशीलपणाने हातळत एकही गुन्हा दाखल होऊ न देता शांतता ठेवली. तसेच केंदळ आणि वळण येथील हिंदू मुलींच्या अपहरणाप्रकरणी तात्काळ या मुलींचा शोध लावून तेथील परिस्थितीवर देखील अटकाव मिळविला तसेच तालुक्यामधे छेडछाडीत आळा घालून महिला भगिनींना सामाजिक सुरक्षाची भावना दिली. अशा या धाडसी अधिकाऱ्याचा कर्तव्यदक्ष जिल्ह्यातल्या भूमिपुत्र असलेले मेघशाम डांगे यांचा पोलीस खात्यातील कार्यकाल संपत आहे.
आता ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ अत्यंत शांततेत आणि आनंदात जावो हीच त्यांची सदिच्छा. राहुरी तालुक्यातील जनतेच्या प्रेमाची शिदोरी बरोबर घेऊन जाताना डांगे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.या धाडसी अधिकाऱ्याला आमचा मानाचा मुजरा अन् सलाम
जय हिंद!!
लेख शब्दांकन- गोविंद फुणगे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत