केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते खेमनर यांना कृषिभूषण पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते खेमनर यांना कृषिभूषण पुरस्कार

आंबी(वेबटीम) श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद चांडेवाडी येथिल प्रगतशिल शेतकरी स्व. पोपटराव खेमनर यांच्या पत्नी श्रीम. लताबाई पोपटराव खेमनर या...

आंबी(वेबटीम)



श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद चांडेवाडी येथिल प्रगतशिल शेतकरी स्व. पोपटराव खेमनर यांच्या पत्नी श्रीम. लताबाई पोपटराव खेमनर यांना डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्सिट्युटचा सन 2023 चा राज्यस्तरीय कृषीभुषण पुरस्कार नाशिक येथिल यशवंत लाँन्स येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी भारतीताई पवार, आमदार अँड राहुल ढिकले, आदर्श सरपंच भास्करराव पेरे, इफकोच्या संचालिका  साधनाताई जाधव, आमची माती आमची माणसचे संपादक प्रा. डॉ. संजय जाधव, माजी नगराध्यक्ष गणेश धाञक, नाम फाऊंडेशनचे योगेश म्हस्के, अन्न महामंडळ संचालक बापुसाहेब शिंदे, भारतीय जीव जंतु कल्याण बोर्डचे चेअरमन दत्तात्रय खेमनर, डॉक्टर किसान किसान बायो रिचर्स इन्सिट्युटचे अध्यक्ष  डॉ. सुनिल दिंडे, संचालक सागर पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



 श्रीम. लताबाई पोपटराव खेमनरचे वय वर्ष ५८ असून आज ही त्या शेती करतात.  त्यांनी  अवघ्या दिड एकर मध्ये  ३९ पोते सोयाबीन तर एक एकर मध्ये २१ पोते गव्हाचे भरघोस उत्पन्न घेतले. आता त्याच्या शेतात दिड एकर उस आहे. त्यात त्यांनी तब्बल पाच अंतर्गत पिके घेतली होती. त्याचे पती स्व. पोपटराव खेमनर यांना देखील सन 2016 - 2017 मध्ये  जिल्हा परिषद अहमदनरचा प्रगतशिल शेतकरी पुरस्कार मिळाला होता. श्रीम. लताबाई खेमनर यांना कृषी भुषण पुरस्कार मिळाल्या बदल जिल्हाभरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे. पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्या त्या मातो श्री  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत