सात्रळ (वार्ताहर) राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांची अंमलबजावणी गतिमान होण्याच्या दृष्टीने चालू...
सात्रळ (वार्ताहर)
राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांची अंमलबजावणी गतिमान होण्याच्या दृष्टीने चालू केलेल्या “शासन आपल्यादारी” अभियानात काही शासकीय विभागांची उपस्थिती नसल्याने त्याबाबत ची उदासिनता दिसून आली आहे. सात्रळ येथे पार पडलेल्या “शासन आपल्यादारी” अभियान सात्रळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडले.
अभियानात महसुल विभागाचे तलाठी श्री. पंडित यांनी महसुल संदर्भातील मिळणारे दाखले, विविध योजना, उतारे, रेशन कार्ड संदर्भातील दाखले, डोल संदर्भातील माहिती, उत्पन्नाचे दाखले, शेतकरी असल्याचे दाखले या बाबत माहिती दिली. सात्रळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हस्के यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळणारे जन्म मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, शासकीय योजनांना लागणारे दाखले याबाबत दाखले देणार असल्याचे नमूद केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. तांबोळी यांनी जननी सुरक्षा योजना, आभा कार्ड साठी आधार कार्ड लिंक करणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना याबद्दल माहिती दिली.
या अभियानात कृषी सहाय्यक धिमते यांना कृषीयोजना , ठिबक सिंचन, शेततळे, फळबाग पिक योजना, तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक शिंदे यांनी निरगम उतारा देनात असल्याचे नमूद केले.
अभियानासाठी पोस्ट खाते, बँक अधिकारी, वन विभाग आदी शासकीय विभागाचे कर्मचारी गैरहजर होते.
या प्रसंगी सात्रळचे सरपंच सतीश ताठे, रमेश पन्हाळे, अॅड. बाळकृष्ण चोरमुंगे, मुस्ताक तांबोळी, सागर डुक्रे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, कर्मचारी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत