राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात खासगी सावकारकी जोमात सूरु असून राहुरी फॅक्टरी येथील सलून व्यावसायिक राहत्या घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेला...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यात खासगी सावकारकी जोमात सूरु असून राहुरी फॅक्टरी येथील सलून व्यावसायिक राहत्या घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेला ५ दिवस उलटले मात्र तो अजूनही मिळाला नसताना राहुरी तालुक्यातील बोधेगाव येथील तरुणाने खासगी सावकारकी जाचास वैतागून आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी व परिसरातील तब्बल १३ सावकारांच्या जाचास वैतागुन हा प्रकार केल्याची माहिती चर्चेतून समजते.
राहुरी तालुक्यात खासगी सावकारकी जोमात सुरू असून अनेक जण यात भरडले जात आहे. राहुरी फॅक्टरी येथील सलून व्यवसायिक गेल्या ५ दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून खासगी सावकारांच्या सततच्या तगाद्याला वैतागून बेपत्ता आहे. नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत आहे, मात्र तरीही अजून मिळाला नाही. याप्रकरणात राहुरी फॅक्टरीच्या ६ सावकारांची नावे समोर आली आहे. मात्र आप्पा थोरात मिळून आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.
दरम्यान याच प्रकारे बोधेगाव येथील तरुण खासगी सावकारकीस वैतागुन बेपत्ता झाला होता. श्रीरामपूर तालुक्यात त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बोधेगाव येथील तरुणास देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावांतील तब्बल १३ खासगी सावकरांचा जात होता. त्यांचा होणारा तगादा, दमबाजी, शिवीगाळ यास कंटाळून गायब होता. मात्र नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊन त्यास कसाबसा घरी आणल्यानंतर त्याने जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा येथील खासगी सावकारकी सध्या चांगलीच चर्चेत असून सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना संपविण्याचे कटकारस्थान या सावकारांकडून होत आहे. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने ' आमचं कुणी काही करत नाही' असे म्हणून आपला अवैध खासगी सावकारकी व्यवसाय जोमाने सुरू आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत