सोनेवाडी(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते सुनील खरात यांची काल रिपब्लिकन पार्ट...
सोनेवाडी(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते सुनील खरात यांची काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
चांदेकसारे व कोपरगाव तालुक्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकारणीच्या नेतृत्वामध्ये सुनील खरात यांनी पार्टीच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. कार्यकर्त्यांचे संघटन हा त्यांचा विशेष गुण आहे.याचीच दखल घेत त्यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथे जिल्हास्तरीय बैठकीत निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेन्द्रभाऊ थोरात,महाराष्ट्र राज्या चे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव साहेब, राष्ट्रीय उपध्यक्ष विजयराव वाकचौरे साहेब,विभागीय प्रमुख भिमाभाऊ बागुल,कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिलभाऊ नन्नवरे तालुउपकाध्यक्ष अरूण भाऊ खरात महीला जिल्हाध्यक्षा सिमाताई बोरूडे,युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे , महीला राष्ट्रीय उपध्यक्षा रमाताई धिवर , तालुकाउपध्यक्ष वंदना ताई म्हसे, स्नेहल ताई दिवे,वैशालीताई सोनावणे, शोभाताई खंडीझोड अदी पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिव पदी निवड झाल्यानंतर खरात यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना खरात त्यांनी सांगितले की पार्टीने दाखवलेले विश्वासा सार्थ ठरवुन कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शाखा ओपन करून कार्यकर्त्यामध्ये नवचेतना निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत