श्री साई राघश्वेर प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री साई राघश्वेर प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सोनेवाडी( वार्ताहर)  कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  रक्तदान शिबिर व ...

सोनेवाडी( वार्ताहर) 



कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण , ग्रामस्थ कुंभारी व साईनाथ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण रााविण्यात आले. याप्रसंगी राघवेश्वर  देवस्थानचे महंत१०८ राघवेश्वरा नदंगिरी महाराज, पंचायत समिती उपसभापती माननीय अर्जुनराव काळे साहेब,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी आय देसले साहेब,तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय शिवाजी आप्पा घुले, गौतम पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री भारती सर, लोकनियुक्त सरपंच तसेच साई राघवेशवर प्रतिष्ठाण अध्यक्ष  प्रशांत  घुले ,उपाध्यक्ष  वाल्मिक निळकंठ  प्रतिष्ठाणचे सचिव श्रीकांत  पैठणे,ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ, ग्रामसेवक कहार भाऊसाहेब,श्री  साई राघवेशवर प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते. श्री साईनाथ ब्लड बँक चे डॉक्टर सन्माननीय डाॕक्टर सौ पितांबरे व त्यांची संपूर्ण टीम, समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळ आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

प्रास्ताविक  वाल्मीक निळकंठ यांनी श्री साई राघश्वेर प्रतिष्ठान गेल्या दशकापासून कशाप्रकारे गावांमध्ये काम करत आहे व आतापर्यंत किती लाभ गावासाठी झाला याची सविस्तर माहिती दिली अशा कार्यक्रमांमधून युवकांनी प्रेरणा घ्यावी असेही प्रतिपादन केले.

 यावेळी महंत१०८ राघवेश्वरा नदंगिरी महाराज यांनी आशीर्वाद पर आपले मनोगत व्यक्त केले.माननीय अर्जुनराव काळे  यांनी आजच्या परिस्थितीत रक्तदान खूप गरजेचे आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आव्हान केले.  पोलीस निरीक्षक  देसले  यांनी रक्तपिढ्यांनी रक्तदात्यांबरोबर कसा व्यवहार करावा व जास्तीत जास्त गरजवंत पेशंटला लवकरात लवकर रक्त कसे पुरवता येईल याचे मार्गदर्शन केले तसेच आजच्या युगात झाडे लावण्याचा फायदा पुढील पिढीसाठी कसा फायदेशीर होईल याची मार्गदर्शन केले.कृषी अधिकारी सोनवणे साहेब यांनी झाडे लावल्यानंतर गावात कोणकोणत्या  प्रकारच्या सरकारी योजना राबवता येऊ शकतात याचे सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाजी  घुले यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व  वृक्षारोपण अशा माध्यमातून ग्रामस्थ हरित कुंभारी स्वच्छ सुंदर कुंभारी यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत आहे लोकसहभाग देत आहेत यासाठी सर्वांचे विशेष आभार व कौतुक केले.  प्राचार्य श्री भारती  यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून दरवर्षी साजरा करतो व तसेच काही औषधी वनस्पतींचा उपयोग कसा होतो हे यावेळी सांगितले. माजी सरपंच प्रशांत घुले साहेब यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपण साठी केलेल्या भरीव योगदान विषयी उपस्थितांना माहिती दिली.  जवळपास २२ लोकांनी रक्तदान केले या सर्वच रक्तदात्याना श्री साईनाथ ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. व त्यांच्या हस्ते २२ वृक्षचे वृक्ष रोपण करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने वड, पिपंळ , चिंच , जाबुंळ ,उंबर,कांचन. अशा झाडांचा समावेश होता.  सूत्रसंचालन अतुल निळकंठ  यांनी केले आभार श्रीकांत पैठणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत