सोनेवाडी (वार्ताहर) स्पर्धा परीक्षा देत असताना अनेक वेळा अपयश आले मात्र न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुकुंद होन यांनी महाराष्ट्र र...
सोनेवाडी (वार्ताहर)
स्पर्धा परीक्षा देत असताना अनेक वेळा अपयश आले मात्र न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुकुंद होन यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत त्यांची सरकारी कामगार ऑफिसरपदी निवड झाली.अजूनही पुढील स्पर्धा परीक्षा देऊन मुकुंद आपले ध्येय निश्चित करेल. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी महत्त्वाचे असते. मुकुंद होनचा आदर्श कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा असे प्रतिपादक संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.
ते काल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एमपीएससीची परीक्षा पास झालेल्या मुकुंद केशवराव होन यांचा गौरव करताना बोलत होते.
यावेळी केशवराव होन, साई आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय होन, प्रशांत होन,सौ काजोल होन अदी उपस्थित होते. पुढे बोलताना बिपिनदादा कोल्हे म्हणाले की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केशवराव होन यांनी कुटुंबाची धुरा सांभाळत मुलांना उच्चशिक्षित केले. होन कुटुंबांची कोल्हे कुटुंबाची नाळ जोडलेली असून पिढ्या-पिढ्याचे ऋणानुबंधाचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची ग्रामीण भागातील तरुण शिकले पाहिजे ते उच्च पदावर गेले पाहिजे अशी नेहमी अपेक्षा असायची शेतकऱ्याचा एक मुलगा घरी आणि एक मुलगा नोकरीला असायला हवा हे ते नेहमी सांगत असे. आज तसा बदल ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.सलग काही वर्ष एमपीएससीची परीक्षा देत असताना मुकुंदाला अपयश आले. मात्र कुटुंबाच्या पाठबळामुळे अखेर त्याला यश मिळाले आहे. त्यामुळे केशवराव होन यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असताना कोल्हे परिवार तुमच्या सोबत सदैव उभा असल्याचे सांगत बिपिनदादा कोल्हे यांनी मुकुंद होन यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना मुकुंद होन आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले वडील व कुटुंबाला दिले. तसेच तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी नेहमी मार्गदर्शन करेल असे त्यांनी सांगितले. शेवटी विजय होन आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत