राहुरी फॅक्टरीत ब्युटी पार्लरला आग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत ब्युटी पार्लरला आग

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील स्व.गुलाबराव कदम यांच्या कॉम्प्लेक्समधील तन्वी ब्युटी पार्लरला आग लागल्याची...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील स्व.गुलाबराव कदम यांच्या कॉम्प्लेक्समधील तन्वी ब्युटी पार्लरला आग लागल्याची घटना घडली. भीषण आगेत ब्युटी पार्लरचे सर्व साहित्य व फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



 मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कोमला कोळसे यांच्या तन्वी ब्युटी पार्लरला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. आगेचे लोळ दिसताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व तरुण मदतीसाठी धावले. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र आगेची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. आगेचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र या दुर्घटनेत अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


कोमल संजय कोळसे ह्या होतकरू गृहिणी हा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होत्या. मात्र दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.



त्यामुळे आज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गीते, उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, सुनील कदम आदींनी जळीत दुकानाची पाहणी करून कोळसे कुटूंबियांना धीर दिला.


 जळीत झालेल्या गृहिणीचा व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने समाजातील दानशूर मंडळी, सामाजिक संस्था यांनी  7447206702 या फोन पे/ गुगल पे क्रमांकावर मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत