राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व धनलक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विष्णुपंत गीते यां...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व धनलक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विष्णुपंत गीते यांचा वाढदिवस ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी ओंकारेश्वर मित्र मंडळाचे प्रा.विलास मुसमाडे, डॉ.राजेंद्र कवडीवाले,जिल्हा बँकेचे श्री.वरपे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, उत्तमराव घोलप, पत्रकार श्रीकांत जाधव,शरद पवार आदींनी शुभेच्छारुपी मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने विष्णुपंत गीते यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ओंकारेश्वर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सर्वांचे आभार ऋषि राऊत यांनी मानले.
राहुरी फॅक्टरी व परिसरासाठी धनलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था व व्यापारी असोसिएशन राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने येत्या वर्षात स्वर्गरथ लोकार्पण करण्याचा संकल्प यावेळी विष्णुपंत गीते यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत