देवळाली प्रवरात काँग्रेसचे जिल्हा सचिव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात काँग्रेसचे जिल्हा सचिव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व व  जिल्हा काँग्रेसचे सचिव अजय खिल...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व व  जिल्हा काँग्रेसचे सचिव अजय खिलारी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

देवळाली प्रवरा बाजारतळ येथे अजय खिलारी मित्र परिवार व काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तदनंतर सन्मान सोहळा पार पडला यावेळी कृष्णा मुसमाडे, माजी नगरसेवक वैभव गिरमे, काँग्रेसचे राजेंद्र बोरुडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, शिवतेज मित्र मंडळाचे बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब आढाव, गजानन घुगरकर, संदीप महाडिक,सचिन निमसे, संदीप मुसमाडे,जाधव सर,सतीश म्हस्के,भारत निर्मळ, मयूर अडागळे आदिंसह दूध उत्पादक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास संसारे,योगेश भालेकर,राहुल महांकाळ,दत्तात्रय गडाख आदिंसह मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले यावेळी सर्वांचे आभार सत्कारमूर्ती अजय खिलारी यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत