आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील सावित्री कोचिंग क्लासेसचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून पहिल्याच वर्षी घवघवीत यश संपा...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील सावित्री कोचिंग क्लासेसचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून पहिल्याच वर्षी घवघवीत यश संपादन केल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये प्रथम क्रमांक अक्षदा रवींद्र काकडे ८१.६० टक्के, द्वितीय समर्थ दिपक शिंदे, ७७.२० टक्के, तृतीय प्रतिक राजेंद्र ओहोळ, ७७.०० टक्के घेत नैपुण्य प्राप्त केले.
ग्रामीण भागातील गुहा सारख्या छोट्याच्या गावात प्रा. प्रेरणा पाटोळे-ओहोळ (एम.कॉम,डी.एड), प्रा. विजय पाटोळे (एम.कॉम.नेट) यांनी सावित्री क्लासेस नावाचे छोटेसे रोपटे लावले असून अल्प दरात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. या वर्षी सावित्री क्लासेसच्या पहिल्याच बॅचच्या तब्बल २२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी पास झाले असल्याची माहिती संचालिका प्रा. प्रेरणा पाटोळे-ओहोळ यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत