राहुरी(वेबटीम) महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. त्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणू...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. त्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई दुशिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील सचिव अक्षय भालेराव या तरूणाची काही जातीयवादी गाव गुंडांनी चाकू, सुरे, तलवारी अशा धारदार शस्त्राचा वापर करून त्याला जिवे ठार मारले. अक्षय भालेराव या तरूणाने गावात प्रथमच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा केला. याचा राग मनात धरुन गावातील काही जातीयवादी लोकांनी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अक्षय भालेराव याची क्रूरपणे हत्या केली.
या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, यात जे राजकीय पुढारी हस्तक्षेप करतील व पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण करतील त्यांना या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे. आरोपीं वरील खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. मयत अक्षय भालेराव याच्या कुटुंबास ५० लाख रूपए मदत देऊन त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. त्या ठिकाणचे पोलिस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे.
तसेच या हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणारे पोलिस प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज सकाळी ११ वाजता नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई दुशिंग, तालूकाध्यक्षा शारदा केदारी, श्रीरामपूर तालूकाध्यक्षा शोभा नवले, युवा शहराध्यक्षा आशा माळी, विमलताई राक्षे.फुलाबाई खरे.नंदाताई झुटिंग.सिंधुताई शेलार.श्रीरामपूर तालूकाध्यक्ष शरण त्रिभुवन, राहुरी शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, बाळासाहेब जाधव, लियाकत सय्यद, विजय ओहळ, संदिप कोकाटे, बाळासाहेब भालेराव, आकाश दिवे, युनूस शेख, किरण दिवे, अजित गायकवाड, निलेश जगधने, जुनेद शेख, आयनोर पठाण, इसहाक शेख इतर कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत