राहुरी(वेबटीम):- अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या 'आवाज जनतेचा वेबपोर्टल'च्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडण्याचे व सर्व...
राहुरी(वेबटीम):-
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या 'आवाज जनतेचा वेबपोर्टल'च्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडण्याचे व सर्वसामान्य वाचकांपर्यंत वास्तव माहिती पोहोचविण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे सुरू असल्याचे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत अनिल प्लाझा येथील आवाज जनतेचा वेबपोर्टल व स्वरांश ग्राफिक्स दालनाला आ.लहू कानडे यांनी आज शुक्रवारी सकाळी भेट दिली. प्रसंगी आ.कानडे बोलत होते.
प्रारंभी आवाज जनतेचा वेबपोर्टलचे संपादक श्रीकांत जाधव, वृत्तसंपादक ऋषि राऊत व स्वरांश ग्राफिक्सचे संचालक गणेश डावखर यांनी आ.कानडे यांचा साईमुर्ती देऊन सन्मान केला.
पुढे बोलताना आ.कानडे म्हणले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सर्वात तत्पर माहिती जात आहे. आवाज जनतेचा वेबपोर्टलने सतत समाजातील विविध प्रश्न समोर आणून ते तडीस नेण्याचे काम करत आहे. आजकालची तरुण पिढी सोशल मीडियावर सर्वाधिक अपडेट असते परन्तु काय चांगलं शिकता येईल तेवढ आत्मसात करून पुढे जाणे गरजेचे आहे. आवाज जनतेचा वेबपोर्टल व स्वरांश ग्राफिक्स माध्यमातून सुरू असलेले कार्य निश्चित कौतुकास्पद असल्याचे आ.कानडे म्हणाले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव अजय खिलारी, दीपक पठारे, गोरख कांदळकर, श्रीकांत जाधव, ऋषि राऊत, गणेश डावखर, डॉ.योगेश पगारे, मयुर घावटे, ओंकार कोबरणे, प्रणय भोसले, विठू राऊत, तुषार राऊत,अनिल वाघमारे, दीपक गाडे, रोहित खंडागळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत